शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील बावनथडी वितरिकेत मृतावस्थेत आढळला पट्टेदार वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 21:02 IST

Bhandara News तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील बपेरा आंबा गड  गाव शिवारातील बावन थडी वितरिकेतील पाण्यात  एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला.

ठळक मुद्देबपेरा आंबागड शिवारातील वितरिका

भंडारा : तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील बपेरा आंबा गड  गाव शिवारातील बावन थडी वितरिकेतील पाण्यात  एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी चार ते पाच च्या सुमारास उघडकीस आली त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकच मोठी गर्दी घटनास्थळी केली. या घटनेमुळे वन विभाग खडबडून जागा झाला असून वाघाच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप गुढ आहे. पट्टेदार वाघाच्या मृत्यूबाबत नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याची माहिती आहे.       

  लेंडेझरी वनपरिक्षेत्र हे सातपुडा पर्वत अंगात असून संपूर्ण जंगल हे घनदाट आहे या घनदाट जंगलातून बावनथडी प्रकल्पाचा मुख्य कालवा व वितरिका जातात. उन्हाळ्यात यावेळी तरीकेतुन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. बापेरा अंबागड शिवारात पाण्याच्या विसर्ग सुरू असतानाच एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. परिसरातील नागरिकांना हा वाघ पाण्यात दिसल्यानंतर त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली त्यानंतर वन विभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत नागपूर येथील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. रात्री किंवा उद्या सकाळी सदर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती आहे.               

वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. वाघाला तहान लागली असावी व तो पाणी पिण्याकरिता वितरीकेत गेला असावा त्यानंतर त्याला बाहेर निघता आले नसावे व शेवटी त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्र हे मध्य प्रदेशाला लागून आहे. मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या दरवर्षी उन्हाळ्यात जंगलात दाखल होतात त्यांनी घातपात तर केला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. शवविच्छेदनानंतरच वाघा चा मृत्यू कशामुळे झाला हे कडणार आहे. वाघाच्या मृत्यूमुळे मात्र वन विभागात एकच खळबळ माजली आहे.

टॅग्स :Tigerवाघ