शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरावर अस्वलाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2023 17:30 IST

किटाडी जंगलातील घटना : मजूर जखमी

- गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जंगलात तेंदुपाने तोडण्यासाठी गेलेल्या मजुरावर झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला करून जखमी केल्याची घटना लाखनी वनविभाग (एफडीसीएम) अंतर्गत मांगली बिटात किटाडी जंगल परिसरात गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

आनंदराव हिरामण चौधरी (६५, किटाडी, ता. लाखनी) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. रोजगाराच्या आशेपोटी या परिसरातील मजूर भल्या पहाटे मागील आठवड्याभरापासून तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जात आहेत. दरम्यान जंगलात गुरुवारी तेंदूची पाने तोडण्यात मग्न असताना अचानक झुडपातील अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले.

त्यांना उपचारार्थ पालांदूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभाग (एफडीसीएम) वनपाल आर.एम.लोणारे, वनरक्षक जी.एच. डोये यांनी पंचनामा केला. अवघ्या चार दिवसातच वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.चार दिवसांपूर्वी महिलेवर हल्लायापूर्वी किटाडी येथील जंगलात तेंदूपत्ता संकलन करत असताना रविवार (ता.१४) रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रानडुकराने वृद्ध महिलेवर पाठीमागून हल्ला केला होता. सत्यभामा रतिराम गोस्वामी (७२, किटाडी, ता.लाखनी) असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.