शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यात ९८ कर्क रूग्णांवर उपचार

By admin | Updated: February 3, 2015 22:50 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोगावर नियंत्रण घालण्याकरिता जगजागरण करण्यात येत आहे. असे असले तरी, एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात जिल्हा सामान्य

भंडारा : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोगावर नियंत्रण घालण्याकरिता जगजागरण करण्यात येत आहे. असे असले तरी, एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात जिल्हा सामान्य रूग्णालयात कर्करोगाचे ९८ रूग्णांवर उपचार करण्यात आले. बुधवारी जागतिक कर्करोग दिन असल्याने सामान्य रूग्णालयात कर्करोग सप्ताह तसेच रूग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांनी आज पत्रपरिषदेत दिली. यावेळी पातुरकर यांनी, २०१३-१४ या वर्षात ५४४ जणांची संशयीत रूग्ण म्हणून तपासणी करण्यात आली. यात १४४ जणांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. कर्करोग बाधितांमध्ये ३२ रूग्णांना तोंडाचा आजार, १० जणांना मानेचा आजार, ३४ जणांना स्तनाचा आजार तर ६८ जणांना अन्य आजाराने ग्रासले होते. यावर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात ३८९ संशयीत रूग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी ९८ रूग्णांना कर्करोग झालेल्याच निदान झाले. यातील १५ जणांना तोंडाचा आजार, १२ जणांना मानेचा कर्करोग, २२ जणांना स्तनाचा कर्करोग तर ४९ जणांना अन्य ठिकाणचा कर्करोगाने बाधित केले. कर्करोग अजूनही बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. त्यामुळे कर्करोगासंबंधी जनजागृतीच्या कार्यक्रमात अडचणी येतात. आरोग्यदायी वर्तणूक, कर्करोगाची लक्षणे आढळल्यास आरोग्य संस्थेत जाऊन निदान करून घेणे आदिबाबत जागरूकता नाही. त्यामुळे अनेकजण वंचित राहत आहे. कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूपैकी २२ टक्के मृत्यूला तंबाखू कारणीभूत आहे. कर्करोग रूग्णांच्या निदानासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा, उपजिल्हा रूग्णालय, तुमसर, साकोली व ग्रामीण रूग्णालय पवनी, लाखांदूर येथे शिबिर अयोजित केले आहे. (शहर प्रतिनिधी)