शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

दोन वर्षात कर्करोगाने ८८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 5, 2016 00:59 IST

चिमूटभर तंबाखू मनुष्याची नशा पुर्ण करतो. मात्र, अनेक घटक पदार्थानेयुक्त तंबाखू शरीरास किती घातक आहे, ..

प्रशांत देसाई भंडाराचिमूटभर तंबाखू मनुष्याची नशा पुर्ण करतो. मात्र, अनेक घटक पदार्थानेयुक्त तंबाखू शरीरास किती घातक आहे, याची कल्पना मनुष्याला येत नाही. त्यामुळे क्षणभरासाठी तंबाखूतून नशेचा आनंद मिळत असला तरी यामुळे मागील दोन वर्षात जिल्ह्यात कर्करोगाने ग्रस्त ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४५ महिला व ४३ पुरूषांचा समावेश असून तुमसर तालुक्यात सर्वाधिक ३४ तर लाखांदूर येथे केवळ एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन वर्षांपासून ते २६ सप्टेंबर २०१५ पर्यंत कर्करोगाने मृत्यू झालेल्यांची नोंद आहे. यात ८८ रूग्णाचा मृत्यू झाला असून त्यात तुमसर तालुक्यात मृत्यूसंख्या सर्वाधिक आहे. भंडारा तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी मृत्यू लाखांदूर येथे झाले असून तिथे एका महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. तंबाखूमुळे मानवाचे आर्युमान सरासरी १५ वर्षाने कमी होते. तंबाखू हे व्यापारी उत्पादन असून त्यामुळे होणारे मृत्यू व एवढी मनुष्यहानी जगातील कुठल्याही व्यापारी उत्पादनाने होत नाही. तंबाखूमुळे गभर्पात होऊ शकतो.तंबाखूमुळे स्त्रियांना होणारे बाळ कमी वजनाचे, मतिमंद, जन्मजात शारीरिक व्याधीसह वा मृत जन्माला येते. तंबाखूमुळे स्त्रियांच्या हिरड्यांना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हिरड्यांचे विकार वाढतात, त्यामुळे दात अकाली पडतात व विद्रुप दिसू शकतात. कर्करोग होण्यामागे तंबाखू हे मुख्य कारण असले तरी शितपेयाचे अतिसेवन, अनुवांशिकता, अनियमित आहार, क्ष-किरणाच्या संपर्कात राहणे, फास्टफुड यांच्यामुळे धोका होतो.महिलांना उद्भवू शकतो त्रासतंबाखूमुळे स्त्रियांना गर्भाशयाचा, फुफ्फुसाचा, तोंडाचा व इतर अवयवांचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. तंबाखूमुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता घटू शकते व रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते. तंबाखूमुळे होणारे दृष्परिणाम लक्षात घेता जे लोक सध्या तंबाखूचे सेवन करीत आहेत, त्यांना व्यसन सोडण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. तंबाखू सेवनापासून परावृत्त केल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शासकीय रूग्णालयात कर्करोग तपासणी शिबिर घेण्यात येतात.- डॉ. देवेंद्र पातूरकर,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा.