शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

८५ टक्के मतदार आधार ‘लिंकिंगविना’

By admin | Updated: May 25, 2015 00:46 IST

बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीला आधार कार्ड जोडण्याची धडक मोहीम मागील ...

बोगस मतदार शोधमोहीम : आधार लिंकिंग मोहीम थंडावलीदेवानंद नंदेश्वर भंडाराबोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीला आधार कार्ड जोडण्याची धडक मोहीम मागील महिन्यांपासून हाती घेतली आहे; परंतु आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४० हजार मतदारांनीच आधार लिंकिंग केले आहे. त्यामुळे मतदार यादी आधार कार्डशी जोडण्याच्या या मोहिमेला मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात ९ लाख २८,४५३ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४ लाख ७२,१४३ पुरुष, ४ लाख ५६,२९७ महिला व १३ इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात ९ लाख २८,४५३ नागरिक १८ वर्षांवरील आहेत. त्यामुळे बनावट मतदार शोधून अचूक मतदार यादी बनविण्याच्या दृष्टिकोनातून मतदार यादीला आधारकार्डाची जोड दिली जात आहे. मतदान कार्ड आणि आधार कार्डमधील माहितीची सांगड घालावी, याबाबत राज्य व केंद्रसरकारच्यावतीने देशभरातील मतदारांची लिंक आधारकार्डशी जोडण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बोगस मतदार समोर येणार आहेत.मतदारांचे छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे व ती माहिती प्रमाणित करण्यासाठी मतदारांची लिंक आधार कार्डशी जोडण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. बोगस मतदान कार्डला आळा बसविणे, एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी असलेल्या मतदारांचे अन्य ठिकाणी असलेले नाव वगळणे, मतदार यादीमधील चुका, मतदार ओळखपत्रामधील दुरुस्त्या आदी सुधारणा या लिंकमुळे शक्य होणार आहे. राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला आॅनलाइनची जोड देण्यात आली आहे. मतदारांना घरबसल्या निवडणूक आयोगाच्या नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल या वेबसाइटवर मतदार कार्डाला आधार कार्डाची जोड देता येणार आहे. वेबसाइट, एसएमएस, टोल फ्री क्रमांक, तहसील कार्यालय व आधार कार्ड यांची सांगड घालता येणार आहे. पहिल्या टप्प्यात आॅनलाइन प्रक्रिया होत असून, संगणकाची माहिती नसणाऱ्या मतदारांच्या घरोघरी जाऊन ही माहिती गोळा केली जात आहे. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मागील महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील केवळ १ लाख ४० हजार मतदारांनीच आत्तापर्यंत आधारकार्डशी मतदार ओळखपत्राच्या क्रमांकाची जोडणी केलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने राज्यभर ही मोहीम राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला मतदारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे उर्वरित मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक करण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर उभे ठाकले आहे. मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी मतदार यादीतील नोंद थेट आधार कार्डशी जोडण्यात येत आहे. ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांकडे आधार कार्डच उपलब्ध नसल्याने त्या मतदारांचे आधार लिंकिंग होणे शक्य नाही. कामे रखडलीआधार कार्डअभावी मतदार यादीला आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया थंडावली आहे. त्यामुळे मतदार आधार कार्डशी लिंक करण्याकरिता मतदारांना आधार कार्ड उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. यामुळे नागरिकांची विविध काम थांबलेली आहेत.