शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

८२ गावेच दुष्काळग्रस्त कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:18 IST

तुमसर व मोहाडी तालुक्यात खरीप व रबी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. प्रशासनाने ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली.

पंचबुध्दे यांचा आरोप : शेतकऱ्यांवर अन्याय, महसूल प्रशासनाचे दुर्लक्षतुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यात खरीप व रबी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. प्रशासनाने ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली. केवळ ८२ गावांना दुष्काळग्रस्त दाखविण्यात आले. भौगोलिकदृष्ट्या तुमसर व मोहाडी तालुक्यांच्या सीमा लागल्या आहेत. दोन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुध्दे यांनी केली आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यात सिंचनाच्या सोयी केवळ कागदावर आहेत. तुमसर तहसील प्रशासनाने केवळ १२ गावांची आणेवारी ५० पैशाच्या खाली दाखविली. मोहाडी तालुक्यात ७० गावांची आणेवारी ५० पैशाच्या आत आहे. दोन्ही तालुक्यातील सर्वच गावे दुष्काळात होरपडत आहेत. दोन्ही तालुक्याच्या सीमा लागुन आहेत. तुमसर व मोहाडी तालुक्यातील केवळ ८२ गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली. जी गावे दुष्काळग्रस्त घोषित झाली व जी गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली नाही त्यात कोणताच फरक नाही. खरीप व रबीची दोन्ही पीक येथे शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. बानवथडी प्रकल्पातून केवळ २० टक्के शेतकऱ्यांनाच सिंचनाचा लाभ मिळाला. तलावातून केवळ बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला. वैनगंगेच्या काठावरची गावे सुध्दा दुष्काळाच्या छायेत आहेत. महसूल प्रशासनाने केलेली आणेवारी दोषपूर्ण आहे. येथे शेतकऱ्यात प्रचंड असंतोष खदखदत आहे. शासनाने येथे पुन्हा सर्वे करावा. तुमसर तालुक्यातील केवळ १२ गावांचा समावेश करण्यात आला. एका गावाजवळील दुसरे गाव येथे दुष्काळग्रस्त यादीत नाही. रस्ता ओलांडल्यानंतर दुसऱ्या गावाच्या सीमा सुरु होतात. एक गाव दुष्काळग्रस्त व दुसरे गाव दुष्काळग्रस्त नाही, हे कसे काय शक्य आहे. असा प्रश्न के.के. पंचबुध्दे यांनी उपस्थित केला. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यातील गावे दुष्काळग्रस्त घोषित झाली नाही. दोन्ही तालुके ुदुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुध्दे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)