शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

आठ न्यायालयांसाठी सव्वा कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:32 IST

जिल्ह्यातील आठ न्यायालयात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी राज्य शासनाने १ कोटी २८ लाख रुपयांच्या कामांना सोमवारला प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागातील तज्ज्ञांनी सदर प्रस्तावात नमूद अग्निप्रतिबंधक उपाययोजना सूचविल्या होत्या. दरम्यान, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने या उपाययोजनांना सहमती प्रदान केली.

ठळक मुद्देराज्य शासनाची मान्यता : अग्निशमन यंत्रणेचा कायमचा प्रश्न निकाली निघणार

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील आठ न्यायालयात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी राज्य शासनाने १ कोटी २८ लाख रुपयांच्या कामांना सोमवारला प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागातील तज्ज्ञांनी सदर प्रस्तावात नमूद अग्निप्रतिबंधक उपाययोजना सूचविल्या होत्या. दरम्यान, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने या उपाययोजनांना सहमती प्रदान केली. त्यामुळे न्यायालयातील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.राज्यातील सर्व जिल्हा व तालुका न्यायालयात अग्निशमन यंत्रणा बसवावे, यासाठी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व न्यायालयीन इमारतींचे फायर आॅडीट करण्याचे काम सुरू करण्यात आले. याचीच फलश्रृती म्हणून अग्निशमन यंत्रणा उभारणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भंडारातील जिल्हा व सत्र न्यायालय इमारत व त्यांच्या नियंत्रणाखालील इमारती तसेच पवनी, मोहाडी, तुमसर, लाखांदूर, साकोली येथील न्यायालयीन इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र अग्निशमन सेवेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सदर प्रस्तावात अग्निप्रतिबंधक उपाययोजना सूचविल्या होत्या. या शिफारशी नुसारच न्यायालयीन इमारतींत अग्निशमन यंत्रणा बसविण्याची कामे करण्यासाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या संचालकानी सहमती दर्शविली आहे. अग्निशमन अधिकाºयांनी सुचित केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने सन २०१७-१८ च्या दरसूचीवरील अंदाजपत्रके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी तयार केली होती. वरिष्ठांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विभागाने मान्यता दिल्याने जिल्हा न्यायालयाच्या नियंत्रणातील सर्व इमारती तसेच, पवनी, मोहाडी, तुमसर, लाखांदूर, साकोलीच्या न्यायालयीन इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारणी केली जाणार आहे. अंदाजपत्रकातील संगणकीकरणाची तरतूद वगळून चार टक्के आकस्मिक खर्च व बारा टक्के वस्तु व सेवा कर असे एकूण १ कोटी २८ लाख ४८ हजार रुपयांच्या कामांना राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.सर्वाधिक २६.५९ लाखांचा निधी मोहाडीलासर्वाधिक २६ लाख ५९ हजार रुपये मोहाडी तालुक्याला मंजूर झाले आहे. पाठोपाठ लाखांदूर तालुक्याला २६ लाख ३४ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. सर्वात कमी २ लाख ८५ हजारांचा निधी दिवाणी व फौजदारी न्यायालय भंडाराला मंजूर झाला आहे. यासोबतच जुनी इमारत, जिल्हा व सत्र न्यायालय भंडाराला ३ लाख ४४ हजार, नवीन इमारत जिल्हा व सत्र न्यायालय भंडाराला ५ लाख ३७ हजार, पवनी तालुक्याला २५ लाख ८६ हजार, तुमसर तालुक्याला १२ लाख १९ हजार व साकोली तालुक्याला २५ लाख ८२ हजारांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.