शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

७८ हेक्टर झुडपी जंगल मॉईलने केले गिळंकृत

By admin | Updated: April 17, 2015 00:35 IST

झुडपी जंगलाची जागा वनेत्तर कामासाठी उपयोगात आणलेल्या डोंगरी (बुज) ग्रामपंचायत अंतर्गत बाजारटोला या

तुमसर : झुडपी जंगलाची जागा वनेत्तर कामासाठी उपयोगात आणलेल्या डोंगरी (बुज) ग्रामपंचायत अंतर्गत बाजारटोला या गावातील ७७.९४ हेक्टर जमिनीवर डोंगरी येथील मॉईलने डम्पिंग यार्ड तयार केले आहे. असे करताना मॉईल प्रशासनाने या ग्रामपंचायतीकडून नाहरकत प्रमाणपत्रही घेतलेले नाही. झुडपी जंगल निर्वणीकरिता ग्रामसभेचा ठराव सादर करण्याकरिता निर्देश दिल्यानंतर प्रत्यक्ष ती जागाच अस्तित्वातच नाही.तुमसर तहसीलदारांनी दि. २८ फेब्रुवारीला डोंगरी (बुज) ग्रामपंचायतला झुडपी जंगल उपयोगात आणण्याकरिता ग्रामसभेचा ठराव सादर करण्याचे लेखी निर्देश दिले. नागपूर विभागातील एकूण वनजमिनीपैकी वन व्यवस्थापनाच्या दृष्टीने अयोग्य असलेल्या झुडपी जमिनीचे वनेत्तर कामाकरिता वळतीकरण करायचे आहे. त्यासाठी तालुकानिहाय, गावनिहाय वर्गवारीनुसार वनसंवर्धन अधिनियम १९८० अन्वये निर्वणीकरणाचा सुलभीकरण प्रस्ताव महसूल प्रशासनामार्फत वनविभागाला प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करून मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार डोंगरी (बुज) ग्रामपंचायतीअंतर्गत बाजारटोला येथे सर्व्हे क्रमांक १८५ मध्ये १२.४६ हेक्टर, १८८ मध्ये ९.२६ हेक्टर, १८९ मध्ये ४.२५ हेक्टर, १९६ मध्ये ७.७२ हेक्टर, २०५ मध्ये १.७६ हेक्टर, २०६ मध्ये ०.१९ हेक्टर, २१७ मध्ये ०.१३ हेक्टर वनजमिनीवर झुडपी जंगल असल्याचे नमूद आहे. एकूण ७७.९४ हेक्टर जमिनीवर डोंगरी (बुज) येथील मॉईल प्रशासनाने ग्रामपंचायत किंवा वनविभागाची पूर्व परवानगी न घेता मॅग्नीज साठवून ठेवण्यासाठी ‘डम्पिंग यार्ड’ तयार केले आहे. या ‘डम्पिंग यार्ड’मुळे उंचच्या उंच टेकड्या निर्माण झाल्या आहेत. मागील १८ ते २० वर्षांपासून मॉईल प्रशासनाचे याठिकाणी नियमबाह्य कामे सुरू आहेत. मॉईलमधून निरुपयोगी साहित्य जवळच्या जवळ जमा करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीवर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची माईलने बचत केली आहे. परंतु या बचतीचा फायदा डोंगरी (बुज) या गावाला मात्र झाला नाही. उलट पर्यावरण आणि मानवी वस्तीत आजाराने शिरकाव केला आहे. बाळापूर व डोंगरी येथे मॅग्नीज डम्पिंगमुळे गावाला वेठीस धरले आहे. याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण समितीला तुमसरचे शिष्टमंडळ भेट देऊन आपबिती सांगणार आहेत. आदिवासींचा रोजगार व आदिवासींच्या जमिन बळकावून त्यांना बेरोजगार करणाऱ्या माईल अधिकाऱ्यांविरुद्ध विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी सांगितले. दरवर्षी इस्पात व खाण तथा पर्यावरण मंत्रालयाचे येथे पथक येतात. त्यांच्याकडून माईलची तपासणी करण्यात येते. परंतु, आजवर या पथकाला एकदाही बाळापूर हे गाव कोणत्या यातना भोगत आहेत, हे दिसलेले नाही. ग्रामस्थांना वेठीस धरुन सुरू असलेल्या माईलच्या या कामाकडे जिल्हा प्रशासनाचेही अद्याप लक्ष गेलेले नाही. (तालुका प्रतिनिधी)