शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

७६ टक्के रोपवाटिका तयार

By admin | Updated: July 2, 2015 00:48 IST

मागील काही दिवसांपासून पाऊस पडत नाही. पडलेच तर अत्यल्प प्रमाणात, तेही कुठे पाऊस तर कुठे नाही.

ओलावा कायम : मात्र पावसासाठी नजरा आकाशाकडे

गोंदिया : मागील काही दिवसांपासून पाऊस पडत नाही. पडलेच तर अत्यल्प प्रमाणात, तेही कुठे पाऊस तर कुठे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा सद्यस्थितीत आकाशाकडे आहेत. असे असतानाही जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ०३५ हेक्टर जमिनीत रोपवाटिका लावण्याचे कार्य पूर्ण केले आहे. मात्र १० दिवसात पाऊस न पडल्यास रोपवाटिकेला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन वर्षांपासून सतत दुष्काळाचे चटके शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. खरीप हंगामात अधिक उत्पन्न घेवून कर्जमुक्त होवू, असे त्यांना वाटते. मात्र आता पाऊस दडी मारल्यासारखा दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तरी सहा-सात दिवस जरी पाऊन आले नाही तरी जमिनील ओलाव्यामुळे रोपवाटिकेवर विपरित परिणाम होणार नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात भात पिकाच्या रोपवाटिकेचे क्षेत्र १७ हजार हेक्टरच्या वर असून सध्या १३ हजार ०३५ हेक्टरमध्ये रोपवाटिका लावण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. गोंदिया तालुक्यात २ हजार १५८ हेक्टर, तिरोडा तालुक्यात दोन हजार २५० हेक्टर, गोरेगाव तालुक्यात एक हजार ३४८ हेक्टर, आमगाव तालुक्यात एक हजार ७०० हेक्टर, सालेकसा तालुक्यात एक हजार ७५ हेक्टर, देवरी तालुक्यात १ हजार ३२७ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यात १ हजार ७१५ हेक्टर व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक हजार ७१५ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका लावण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या नोंदीनुसार जून महिन्यात ११२ टक्के पाऊस पडले आहे. २५, २६ व २९ जून रोजी सर्वच तालुक्यात पाऊस पडले आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा असून रोपवाटिका सद्या वाळण्याची शक्यता नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)संकरित तूर बियाणे मोफत वितरितशासनाने कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २५ क्विंटल आयसीपीएच २७४० नावाचे संकरित तूर बियाणे शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी लाभार्थ्यांना हे बियाणे मोफत वितरित केले जात असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात गोंदिया तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.३ क्विंटल, गोरेगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल, तिरोडा तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल व देवरी तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल वाटप करणे सुरू आहे. तसेच आमगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी या तिन्ही तालुक्यातील प्रत्येकी ७०० शेतकऱ्यांना २.५ क्विंटल सदर तूर बियाणे मोफत वाटप केले जात आहे.