लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दारुची चोरटी वाहतूक करण्यासाठी तस्कर नाना क्लृप्त्या करीत असून भंडारा लगतच्या बेला येथील कारवाईत वाहनाच्या रबरी ट्युबमधून तब्बल ७५० लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. ही कारवाई गांधी जयंतीच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली.राष्ट्रीय महामार्गावर गस्त सुरु असताना बेला जवळ मारोती कार क्रमांक एमएच ३१ सीएम ९९८९ ची झडती घेण्यात आली. त्यावेळी या कारमध्ये ५० लिटर क्षमतेच्या १५ काळ्या रंगाच्या रबरी ट्यूबमध्ये ७५० लिटर हातभट्टीची दारु आढळून आली. या प्रकरणी आरोपी मिथून राजहंस मेश्राम (२८) रा.मुजबी गोपाळटोली ता.भंडारा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण, उपायुक्त वर्षा वर्मा, भंडारा अधीक्षक शशीकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी कदम, मारोती मोहिते, पांडूरंग घरटे, अरविंद कोटांगले, जयघोष जनबंधू यांनी केली.
ट्यूबमधून ७५० लिटर दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:48 IST
दारुची चोरटी वाहतूक करण्यासाठी तस्कर नाना क्लृप्त्या करीत असून भंडारा लगतच्या बेला येथील कारवाईत वाहनाच्या रबरी ट्युबमधून तब्बल ७५० लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. ही कारवाई गांधी जयंतीच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली.
ट्यूबमधून ७५० लिटर दारु जप्त
ठळक मुद्देबेला येथे धाड : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई