शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ल्यानंतर ७५ जणांना विषबाधा; एका बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 15:07 IST

Bhandara News आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्याने तब्बल ७५ जणांना विषबाधा हाेवून एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे मंगळवारी घडली. आराेग्य विभागाने गावात धाव घेवून शिबिर लावले आहे.

ठळक मुद्देपवनी तालुक्यातील भेंडाळाची घटना

 लोकमत न्यूज नेटवर्क  

भंडारा : आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्याने तब्बल ७५ जणांना विषबाधा हाेवून एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे मंगळवारी घडली. आराेग्य विभागाने गावात धाव घेवून शिबिर लावले आहे.

ज्ञानेश्वरी रामदास सतीबावने (११) रा. भेंडाळा असे मृत बालिकेचे नाव आहे. भेंडाळा येथे रविवारी आठवडी बाजार हाेता. या आठवडीबाजारात अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. साेमवारी दुपारपासून अनेकांना उलटी आणि मळमळचा त्रास व्हायला लागला. याबाबतची माहिती आराेग्य विभागाला देण्यात आली. दरम्यान मंगळवारी तब्बल ७५ जणांना त्रास जाणवायला लागला. त्यामुळे जिल्हा आराेग्य विभागाने भेंडाळा ग्रामपंचायत कार्यालयात शिबिर लावून उपचार सुरु केले. आतापर्यंत ७५ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके यांनी दिली. दरम्यान मंगळवारी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी सतीबावने या बालिकेचा मृत्यू झाला. ती पाचव्या वर्गाची विद्यार्थीनी हाेती. जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी भेंडाळा येथे धाव घेतली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.

पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील घटनेतील व्यक्तींची प्रकृती स्थिर असून आरोग्य विभाग याबाबतची काळजी घेत आहे. आरोग्य विभागाने या ठिकाणी तातडीने आरोग्य तपासणी शिबिर सुरू केले आहे. पाणी पुरी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारुकी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी भेंडाळा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पाणी पुरी स्टॉलचे नमुने घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा