शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

७९ पैकी ७२ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजले आहेत. सुदैवाने जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण अद्यापपर्यंत आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ७९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी ३४ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व निगेटिव्ह आले आहे.

ठळक मुद्देसात अहवालांची प्रतीक्षा : हॉस्पीटल क्वारंटाईनमधून ४४ जणांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर! जिल्हा रुग्णालयातून कोरोना संदर्भात तपासणीसाठी पाठविलेल्या ७९ नमुन्यांपैकी ७२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर सात अहवालांची प्रतीक्षा आहे. नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या ४४ जणांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोणाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही. मात्र प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत असून संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यावर भर दिला जात आहे.कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजले आहेत. सुदैवाने जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण अद्यापपर्यंत आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ७९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी ३४ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत प्राप्त सर्वचा सर्व म्हणजे ७२ नमुने निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. अद्याप सात अहवालांची प्रतीक्षा आहे.मुंबई, पुणे व इतर राज्यातून १ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत १८ हजार २०१ व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले आहे. या सर्वांची रॅपिट रिस्पॉन्स टीमने भेट घेवून तपासणी केली. यासर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात १३ व्यक्ती दाखल आहे. तर आतापर्यंत ४४ जणांना सुटी देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. मात्र प्रशासन प्रत्येक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असल्याने प्रादूर्भावावर निर्बंध आला आहे.होम क्वारंटाईनचा कालावधी २८ दिवसांचाकोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार २०१ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पूर्वी होम क्वारंटाईनचा कालावधी १४ दिवसाचा होता. मात्रा आता तो दुप्पट म्हणजे २८ दिवसांचा करण्यात आला आहे. या कालावधीत होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये असे आदेश देण्यात आले आहेत. घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.आयसोलेशन वॉर्डात सहा व्यक्तीभंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सहा व्यक्ती दाखल असून आतापर्यंत सात व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली आहे. गुरुवारी १३ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना संदर्भात सुसज्ज यंत्रणा कार्यरत आहे. तर जिल्ह्यातील नऊ चेक पोस्टवर प्रत्येक वाहनांची तपासणी होत असून वैद्यकीय पथक तैनात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या