शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

आठ ट्रॅक्टरविरुध्द ७१ हजाराचा दंड

By admin | Updated: March 6, 2016 00:13 IST

तालुक्यात सध्या सर्रास रेती, मुरूम व गिट्टी चोरी करणे सुरू असून शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.

महसूल विभागाची कारवाई : गौण खनिजाचा समावेशतुमसर : तालुक्यात सध्या सर्रास रेती, मुरूम व गिट्टी चोरी करणे सुरू असून शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. शुक्रवारी दिवस तथा रात्री पाच रेतीचे, दोन मुरूम व एक गिट्टीचा ट्रॅक्टर तुमसर तहसीलदारांच्या पथकाने पकडले. त्यांच्यावर ७० हजार ७०० रूपयाचा दंड ठोठावण्यात आला. सध्या हे ट्रॅक्टर तुमसर तहसील कार्यालयासमोर उभे आहेत.ट्रॅक्टर एमएच ३६ ९८८७, एमएच ३६ एल ४०२९, एमएच ३६ डी ९८४१, एमएच ३६ एल ४१४, एमएच ३६ एल ५६३७ अन्य ट्रॅक्टर विना क्रमांकाचे आहेत. एक ब्रास रेतीवर ५ हजार ४०० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शुक्रवार दिवस तथा रात्री दरम्यान तहसीलदार डी.टी. सोनवाने यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली. शहराच्या रस्त्यावरून ही अवैध ट्रॅक्टर धावत होते. अवैध गिट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ७,९०० रूपये व मुरूम ट्रॅक्टरवर ५,४०० रूपये प्रती ब्रास दंड आकारण्यात आला. तहसीलदारांच्या पथकात तलाठी रंगारी, तलाठी पाथरकर यांचा समावेश होता. तुमसर तालुक्यातील लोभी, आष्टी देवनारा व वारपिंडकेपार या नदी घाटांचा लिलाव यावर्षी झाला, अन्य रेती घाटांचा लिलाव अद्याप झाला नाही. माडगी, चारगाव, निलज, सुकळी, बाम्हणी तामसवाडी सिहोरा या प्रमुख नदी घाटांचा लिलाव अद्याप झाला नाही. परंतु या नदी घाटावरून सर्रास रेतीचे उत्खनन करणे सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)