शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराची ७१ पोती तांदूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:48 IST

पहेला येथील गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचे ७१ पोती ट्रकमध्ये भरुन नेत असताना उपसरपंच अनिल गिरडकर, अमोल भुरले, जितू बांते व गावकऱ्यांनी पकडला.

ठळक मुद्देगांधी विद्यालयातील प्रकार : पहेलावासीयांची कारवाई

आॅनलाईन लोकमतपहेला/अड्याळ : पहेला येथील गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचे ७१ पोती ट्रकमध्ये भरुन नेत असताना उपसरपंच अनिल गिरडकर, अमोल भुरले, जितू बांते व गावकऱ्यांनी पकडला. ही घटना रविवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाजता घडली.तांदूळ पॉलिश करण्यासाठी नेले जात होते, असे कारण समोर आले असले तरी यामागचे खरे कारण वेगळेच आहे.कोंढा येथील नरेंद्र कावळे यांचा मालकीचा ट्रक क्रमांक एम एच ३१, सीबी ५४१ हा जप्त करण्यात आला. ट्रकवरील चालक मनीराम जोंधरु पदेले रा. कोंढा यांच्या सांगण्यानुसार ट्रकमध्ये एकुण ७१ तांदळाचे पोती भरले असल्याचे सांगितले. शाळेच्या क्रीडा कक्षातून येथील सहायक शिक्षक काटेखाये यांनी खोलीचे कुलूप उघडून दिले असल्याचे ट्रक चालकाने सांगितले. घटनेची माहिती अड्याळ पोलीस ठाणे, तहसीलदार भंडारा. शालेय पोषण आहार जिल्हा अधीक्षक मनिषा गजभिये यांना देण्यात आली.माहिती मिळताच मनीषा गजभिये यांनी घटनास्थळाला भेट दिली. शाळेतील शिल्लक उर्वरीत धान्याचा पंचनामा केला. त्यात १५ क्विंटल तांदुळ, हळद, मिठ, मसाला मिरची, मुंग व इतर साहित्य मिळाले.मिळालेल्या साहित्यात बहुतेक साहित्य मुदत गेलेल्या तारखेत आढळला. शालेय पोषण आहाराची जबाबदारी असलेले सहायक शिक्षक काटेखाये यांची विचारपुस केली असता सदर तांदुळ हा पॉलीश करण्याकरिता कोंढा येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले. पहेला येथे आठ राईसमिल असताना कोंढा येथे का नेत आहेत, या प्रश्नावर ते निरुत्तर झाले.घटनास्थळी पहेलाचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, पहेला येथील सरपंच सुनिल गेंडे, निमगावचे सरपंच शंकर मडावी, दयानंद नखाते, पहेला येथील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विकास भुरले तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी गावात चर्चेला उधाण आले होते.अड्याळ ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल डोंगरे, बोरगावचे बीट जमादार भोंगाडे यांनी पंचनामा करुन ७१ पोती तांदुळ व ट्रक पोलीस ठाण्यात जमा केले. पुढील तपास सुरु आहे.या प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल. यात दोषी आढल्यास कारवाई केली जाईल. हा प्रकार किळसवाना असून नक्की काय झाले हे चौकशीत स्पष्ट होईल.-मनिषा गजभिये,शापोआ अधिक्षक, पं.स. भंडाराट्रकमध्ये असलेले तांदुळ पॉलीश करण्यासाठी नेले जात होते. अफरातफरीचा प्रश्नच येत नाही.- नरेंद्र कावळे,संस्था सहसचिव, कोंढा.शालेय पोषण पळवापळवी करण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी.- सुनिल शेंडे,सरपंच, पहेला.चौकशीअंती अहवाल प्राप्त झाल्यानंतर तक्रार नोंदविल्यास पुढील कायदेशिर कारवाईची प्रक्रिया करण्यात येईल.- एम. सी. डोंगरे,पोलीस उपनिरिक्षक, अड्याळ