शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

६९३ गावांना टंचाईसदृश्य परिस्थितीतून वगळले

By admin | Updated: January 15, 2015 22:45 IST

धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केली आहे.

देवानंद नंदेश्वर - भंडाराधानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केली आहे. यात १५४ गावांची ५० पैसेपेक्षा कमी तर ६९३ गावांची ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ६९३ गावातील शेतकऱ्यांना टंचाईसदृश्य स्थितीतून वगळले आहे. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना सवलतींचा लाभ मिळणार नाही.खरीप हंगामात धानाचे उत्पादन कमालिचे घटल्याने शेतकऱ्यांवर बिकट परीस्थिती ओढावली आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत ६९३ गावातील पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्हा प्रशासनाने ८४७ गावांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे दर्शविली आहे. यातील १५४ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ६९३ गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.भंडारा तालुक्यातील १७० गावांची पैसेवारी ६० पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ६० पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ५९ पैसे, पवनी तालुक्यातील १५१ गावांची पैसेवारी ५१ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५९ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ५४ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ५१ पैसे दाखविण्यात आली आहे. यातील १० गावे अकृषक पाण्याखालील पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर केली नाही. यामध्ये पवनी तालुक्यातील १० गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८७८ एकूण गावांपैकी ८४७ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. पवनी तालुक्यातील १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत. यापैकी ८४७ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. यात ६९३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी जिल्हा प्रशासनाने धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही अंतिम आणेवारी ५६ पैसे दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे़१५४ गावांना मिळणार लाभजिल्ह्यातील १५४ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. यात भंडारा तालुक्यातील एक, मोहाडी तालुक्यातील २४, तुमसर ९, पवनी ४८, लाखांदूर ३४, लाखनी ३८, तर साकोली तालुका निरंक दाखविण्यात आला आहे. १५४ गावे टंचाई सदृश्य परिस्थतीत असल्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, दहावी व बारावी परिक्षेचे शुल्क माफ, रोहयो अंतर्गत निकषात शिथीलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी टँकरने पुरविणे, कृषीपंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत.