शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

६.८० लाख रूपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:57 IST

चंद्रपूर या दारूबंदी जिल्ह्यात दारूची अवैध तस्करी करताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६.८० लाख रूपयांची दारू वाहनासह पकडली. ही कारवाई पवनी तालुक्यात करण्यात आली.

ठळक मुद्देपवनी येथे वाहन पकडले : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चंद्रपूर या दारूबंदी जिल्ह्यात दारूची अवैध तस्करी करताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६.८० लाख रूपयांची दारू वाहनासह पकडली. ही कारवाई पवनी तालुक्यात करण्यात आली.गोपणीय माहितीच्या आधावर पाळत ठेऊन असलेल्या या पथकाला पवनी तालुक्यात चारचाकी (क्र.एम.एच. ४०/एस.आर. ९०११) हे वाहन दिसले. त्यांनी या वाहनाला थांबविण्याचा ईशारा केला असता वाहनचालकने वाहनाचा वेग वाढवून वाहन पळवून नेले. त्यानंतर या वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले.त्यानंतर या वाहनाची झडती घेतली असता त्यात ५० खरडयाच्या पेट्यांमध्ये देशी दारूच्या ५० मिली व ९० मिलीच्या ५ हजार सीलबंद शिशा आढळून आले. वाहनासह ६.८० लाख रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी आरोपी अंकुश रमेश शेंडे रा.बाम्हणी, ता.नागभीड जि.चंद्रपूर याला अटक करण्यात आली. पवनी तालुक्याला दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागून असल्यामुळे हा देशी दारूचा साठा चंद्रपूर जिल्ह्यात जात असावा, असा प्राथमिक अंदाज असल्याचे पथकाने सांगितले.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त उषा वर्मा व अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक साकोलीचे निरिक्षक ब्रिजलाल पटले, प्रभारी निरिक्षक संतोष मेहकरकर, सहाय्यक दुय्यम निरिक्षक विनोद सोनलवार, किशोर बिरणवारे, राकेश राऊत, रविंद्र बावनकुळे, मंगेश ढेंगे, राजू श्रीरंग यांनी केली असून तपास निरिक्षक ब्रिजलाल पटले हे करीत आहेत.