शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दोन दिवसात कोरोनाचे ६६ पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडूनही वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक जबाबदारी घेतली जात आहे. स्थिती नियंत्रणात असली तरी वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत भर घातली आहे. भंडारा शहरातही गत आठवड्याभरात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरात शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला होता.

ठळक मुद्देसंख्या पोहोचली ५४२ वर : सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात, साकोली व मोहाडीत ५९ तर तुमसरात ६८ व्यक्ती बाधीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने परिस्थिती गंभीर केली आहे. शनिवारी ३६ तर रविवारी ३० रुग्ण बाधीत आढळल्यानंतर जिल्ह्यात एकुण बाधीतांची संख्या ५४२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे १३ आॅगस्ट रोजी भंडारा तालुक्यातील एका ६५ वर्षीय महिलेला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिचा १४ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. संसर्ग बाधीतांची संख्या सातत्याने वाढत असल्याचेही दिसून येत आहे.तालुकानिहाय कोरोना बाधीतांच्या संख्येवर नजर घातल्यास सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात दिसून येत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात १८९, साकोली ६७, लाखांदूर २५, तुमसर ८१, मोहाडी ९२, पवनी ४० तर लाखनी तालुक्यात ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी आढळलेल्या ३० रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात १०, साकोली ०२, तुमसर तालुक्यात ०३, मोहाडी तालुक्यात ०८, पवनी तालुक्यात ०४ तर लाखनी तालुक्यात ०३ रुग्ण बाधीत आढळले आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेकडूनही वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक जबाबदारी घेतली जात आहे. स्थिती नियंत्रणात असली तरी वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत भर घातली आहे. भंडारा शहरातही गत आठवड्याभरात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरात शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसादही दिला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लक्ष १४ हजार २९१ नागरिकांनी आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याचा उपयोग केला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने १०२७८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले आहे. आजघडीला २०३ व्यक्ती पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आतापर्यंत आयसोलेशन वॉर्डातून ९३५ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. या वॉर्डात आता १८१ व्यक्ती भरती आहेत. जिल्ह्यात अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे ४०४४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये आतापर्यंत १०८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३९३६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.६५ वर्षीय महिलेचा मृत्यूभंडारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय महिला रुग्णाला मेंदू आघात झाल्याने १३ आॅगस्टच्या मध्यरात्री नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर वृध्द महिलेचा उपचारादरम्यान १४ आॅगस्टला मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ०५ झाली आहे. शनिवारी ३६ रुग्ण आढळले असून त्यात भंडारा तालुक्यातील २०, साकोली ०५, मोहाडी तालुक्यातील १० तर लाखनी तालुक्यातील ०१ रुग्णाचा समावेश आहे. रविवारी १४५ जणांचे नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. रविवारी २१ जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे.३३४ रुग्णांना मिळाली सुटी२७ एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत एकुण रुग्ण संख्या ५४२ इतकी झाली आहे. आठवड्याभरापूर्वी ३००च्या घरात असलेल्या या संख्येने आठ दिवसांच्या कालावधीत पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत ३३४ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या