शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत ६६ लाख रूपयांचा कर जमा

By admin | Updated: November 15, 2016 00:25 IST

नोटाबंदीच्या धक्कातंत्राचा काहीसा फटका सामान्यजणांना बसत असला तरी ५००-१००० च्या नोटांनी नगरपालिकेला सुगीचे दिवस आले आहेत.

पालिकांना ‘अच्छे दिन’ : तीन दिवसांत स्वेच्छेने विक्रमी कर वसुलीभंडारा : नोटाबंदीच्या धक्कातंत्राचा काहीसा फटका सामान्यजणांना बसत असला तरी ५००-१००० च्या नोटांनी नगरपालिकेला सुगीचे दिवस आले आहेत. मागील चार दिवसांत नगर परिषद व नगर पंचायतींना करापोटी ६६ लाख रूपयांची वसुली झाली आहे. ही वसुली रात्रीपर्यंत ७० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.मंगळवारी रात्री १२ वाजतापासून ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द होत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थासह महावितरण, सिंचन पाणीपट्टी करासाठी जुन्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा स्वीकारले जातील, असा निर्णय घेतला. त्यासाठी १४ नोव्हेंबरची मुदतवाढ दिली. कर आणि अन्य देयके भरण्यासाठी भंडारा जिल्हावासीयांनी गर्दी केली. गृहकर, मालमत्ताकर, पाणीपट्टीकर, बांधकाम परवानगी शुल्क ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या चलनात स्वीकारणार असल्याचे सांगितले. १२ नोव्हेबरपर्यंत ३३ लाख, १३ नोव्हेंबरपर्यंत ५१ आणि आज १४ नोव्हेंबरपर्यंत ६६ लाख रूपये नगर परिषद, नगर पंचायतीच्या तिजोरीत जमा झाले. (शहर प्रतिनिधी)तुमसरात १३.३४ लाखांची वसुलीतुमसर : ५०० व १००० रूपयांच्या चलनी नोटा बंद झाल्यानंतर तुमसर नगर परीषदेत नागरिकांनी आतापर्यंत १३,३४,९९२ लक्ष मालमत्ता कर जमा केले. यापूर्वी नगर परिषदेने गृहकराची विक्रमी वसुली केली होती. सध्या ९५ टक्के गृहकराची वसुली झाली आहे. परंतु नोटा बंदमुळे नगर परिषदेला अच्छे दिन आले आहे.तुमसर नगर परिषद ‘ब’ दर्जाची आहे. ५०० व १००० च्या नोटा बंदपूर्वी गृहकराची वसुली करण्यात आली होती. परंतु चलनी नोटा बंद झाल्यामुळे गृहकराची १०० टक्के वसुली होण्याची शक्यता आहे. चलनातील जुन्या नोटा कर म्हणून भरल्या जाऊ शकतात, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बँकेत जुन्या नोटा रांगेत लागून जमा करण्यापेक्षा नगर परिषदेला गृह कर देण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. जे कर मागण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या घरी वारंवार जावे लागत होते. त्या नागरिकांनी स्वत:हून रांगा लावत नगर परिषदेत कर जमा केला. ( तालुका प्रतिनिधी)