शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

६.२३ कोेटींचे चुकारे अडले

By admin | Updated: April 4, 2016 01:04 IST

खरीप हंगामात धान उत्पादनात घट झाली आहे. यावर्षांत जिल्ह्यातील ५७ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर १७,३४६

देवानंद नंदेश्वर ल्ल भंडाराखरीप हंगामात धान उत्पादनात घट झाली आहे. यावर्षांत जिल्ह्यातील ५७ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर १७,३४६ शेतकऱ्यांकडून एकूण ६ लाख १७ हजार ३६६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ या धानाची किंमत ८७ कोटी ०४ लाख ८६ हजार ६० रूपये एवढी आहे. यासह शेतकऱ्यांना प्रती क्विटल २०० रुपये बोनसप्रमाणे १२ कोटी ३४ लाख ७३ हजार २०० रुपयांचे वाटप होत आहेत. ३१ मार्चपर्यत शेतकऱ्यांना धान खरेदी व बोनस मिळून एकूण ९३ कोटी १० लाख ५६ हजार १९५ रुपयांचे चुकारे वाटप करण्यात आले आहे. अद्यापही ६ कोटी २३ लाख ३ हजार १५ रुपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे अडले आहे.भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला होता़ निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिक उत्पादनात घट झाली. यावर्षी सुरुवातीला धान खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. विविध संघटनांच्या आक्रमक भूमिकांमुळे जिल्ह्यात एकुण ५७ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. उच्च प्रतिच्या धानाला प्रती क्विंटल १,४६० रूपये तर, साधारण प्रतिच्या धानाला १,४१० रुपये आधारभूत किंमत देण्यात आली. १ नोव्हेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण ६ लाख १७ हजार ३६६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ यात भंडारा तालुक्यात ११ हजार ५४३.५५, मोहाडी तालुक्यात ३० हजार ६८३.२५, तुमसर तालुक्यात १ लाख २२ हजार ८९५.७०, लाखनी तालुक्यात १ लाख २३ हजार ९९६.२०, साकोली तालुक्यात ९७ हजार २०९.८०, लाखांदूर तालुक्यात १ लाख ५७ हजार ७७३.२० तर, पवनी तालुक्यात ७३ हजार ६४.६० क्विंटलचा समावेश आहे.८७.०४ कोटींची धान खरेदी४जिल्ह्यात ८७ कोटी ४ लाख ८६ हजार ६० रुपयांची धान खरेदी करण्यात आली़ जिल्ह्यात अ ग्रेड धानाची खरेदी झालेली नाही. साधारण धानाची ६ लाख १७ हजार ३६६ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १७,३४६ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपयांप्रमाणे १२ कोटी ३४ लाख ७३ हजार २०० रुपयांची वाटप प्रक्रीया सुरु आहे. धान खरेदी व बोनस मिळून ९९ कोटी ३९ लाख ५९ हजार रुपयांच्या रक्कमेपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेमध्ये ९६ कोटी २३ लाख ८३ हजार १६७ रुपयांची हुंडी दाखल करण्यात आली. शेतकऱ्यांना धान व बोनसचा मोबदला म्हणून ९३ कोटी १० लाख ५६ हजार १९५ रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली़ ६ कोटी २३ लाख ३ हजार १५ रुपयांचे चुकारे अद्यापही अडले आहेत.धान खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. १७,३४६ शेतकऱ्यांना धान व बोनसचा मोबदला म्हणून ९३ कोटी १० लाख ५६ हजार १९५ रुपयांची रक्कम वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ६.२३ कोटी रुपयांच्या रक्कमेचे लवकरच वाटप होईल.- चंद्रकांत खाडे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.