शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्पांत 60 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 06:00 IST

देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसाने प्रकल्पातील जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली ...

देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसाने प्रकल्पातील जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट जलसाठा आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सध्या 60.99 टक्के जलसाठा असून त्यात सर्वाधिक मध्यम प्रकल्पात 71.84 टक्के जलसाठय़ाचा समावेश आहे. मुबलक पाणी प्रकल्पांमध्ये असतानाही नियोजन मात्र शून्य दिसत आहे.भंडारा जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरना हे चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा संकल्पीत उपयुक्त साठा 42.815 दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात 30.761 दलघमी पाणी असून याची टक्केवारी 71.846 आहे. 31 लघु प्रकल्पांचा संकल्पीत उपयुक्त साठा 53.54 दलघमी असून सध्या या प्रकल्पात 28.858 दलघमी म्हणजे 53.898 टक्के जलसाठा आहे. 28 माजी मालगुजारी तलावांची संकल्पीत उपयुक्त जलसाठा क्षमता 25.380 दलघमी असून सध्या या प्रकल्पात 14.631 दलघमी म्हणजे 57.64 टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गत तीन वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठा तिपटीने वाढल्याचे दिसत आहे. 2019 मध्ये जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये केवळ 21.21 टक्के जलसाठा होता तर 2018 मध्ये 24.50 टक्के जलसाठा नोंदविल्या गेला होता. दोन वर्षाच्या तुलनेत यंदा मुबलक पाणी प्रकल्पांमध्ये असले तरी नियोजन शून्यतेचा फटका बसू शकतो. सिंचनासाठी पाणी सोडण्याचे योग्य नियोजन जिल्ह्यात करण्यात आले नाही. त्यामुळे उन्हाळी पिकांना वेळेवर पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. यासाठी पाठबंधारे विभागाने वेळीच नियोजन करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे.प्रकल्प तुडूंब तरीही पाणीटंचाईजिल्ह्यातील सर्व प्रकल्प सद्यस्थितीत तुडूंब दिसत असले तरी प्रशासनाच्या लेखी जिल्ह्यातील 617 गावांमध्ये पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत 337 तर एप्रिल ते जून या कालावधीत 280 गावे पाणीटंचाईने प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून 12 लाख 90 हजार रुपयांचा हा कृती आराखडा आहे. प्रकल्पातील पाण्याचा योग्य वापर केला तर पाणीटंचाईवर मात होऊ शकते. मात्र या प्रकल्पाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. याचा अनुभव यंदाही येत आहे.