शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

जिल्ह्यात ५४ टक्के जलसाठा शिल्लक

By admin | Updated: September 9, 2015 00:43 IST

वरूणराजाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसाअभावी पिके करपू लागली असतानाच तीव्र उकाड्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य होत आहे.

भंडारा : वरूणराजाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसाअभावी पिके करपू लागली असतानाच तीव्र उकाड्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य होत आहे. जिल्ह्यातील ४ मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५0 टक्के प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर २८ जुने मालगुजारी तलावात ७३.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा संपण्याच्या स्थितीत असून जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात फक्त ५३.६९ टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ५३.६९ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी ७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ६0.१५ टक्के जलसाठा होता. मात्र, पाऊस कमी पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठ?ात ६.४६ टक्क्यांनी घट झाली आहे. लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे.सद्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ४0.७२, बघेडा ५७.६९ टक्के जलसाठा आहे. बेटेकर ४0.६४ टक्के व सोरना जलाशयात फक्त २२.२८ टक्केच पाणी असून चारही मध्यम प्रकल्पात ४0.0४ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी चार मध्यम प्रकल्पात ७ सप्टेंबरपर्यंत ५६.३७ टक्के जलसाठा शिल्लक होता.जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सद्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ५४.९८ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ७३.९७ टक्के आहे. ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा असला तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. अनेक भागात नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा संपण्याचा स्थितीत असतानाही जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ६५.३५७ ददशलक्ष घनमीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी दि. ७ सप्टेंबरला ६३ प्रकल्पात ७३.२२९ दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता. त्याची टक्केवारी ६0.१५ एवढी होती. जिल्ह्यातील २८ मालगुजारी तलावात २५.३८0 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा साठवून ठेवता येते. यावर्षी या तलावात १८.७७३ दशलक्ष घनमीटर जलसाठा असून ७३ टक्के पाणी तलावात शिल्लक आहे. मात्र, संपूर्ण ६३ प्रकल्पात १२१.७३९ दशलक्ष घनमीटर जलसाठा असल्याची क्षमता असतांना केवळ ६५.३५७ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी च्या तुलनेत यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यात प्रकल्पात अल्प प्रमाणात पाणी असल्याने जनावरांसह वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे. (प्रतिनिधी)