शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

५२ तलावांतून काढला ४५ हजार घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:39 IST

धरणातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राज्य शासनाने उन्हाळ्यात राबविले.

ठळक मुद्देलोकमत शुभ वर्तमान : जिल्ह्यातील ७३७ शेतकºयांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धरणातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राज्य शासनाने उन्हाळ्यात राबविले. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५२ तलावातून ४५ हजार ३७ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आले. या तलावातून काढलेला गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला असून यावर्षी तलावाच्या जलसाठ्यात वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने मे महिन्यात ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. जलसाठयांची पुनरस्थापना करणे. जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत शाश्वत स्वरूपाची वाढ करणे आणि शेत जमिनीचा पोत सुधारून उत्पन्न वाढीसाठी मदत करणे या हेतूने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.राज्यातील २५० हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या ८२ हजार १५६ धरणांपैकी ३१ हजार ४५९ धरणांची साठवणूक क्षमता ४२.५४ लक्ष घनमीटर इतकी आहे. या धरणातील गाळ काढल्यास ही साठवणूक क्षमता मोठया प्रमाणात वाढणार आहे. हा दृष्टीकोन ठेऊन हे अभियान हाती घेण्यात आले.भंडारा जिल्ह्यात या अभियानात ५२ तलावांची निवड करण्यात आली होती. यात भंडारा तालुक्यात १२, पवनी तालुक्यात ७, तुमसर तालुक्यात ८, मोहाडी तालुक्यात ८, साकोली तालुक्यात ७, लाखनी तालुक्यात ७ आणि लाखांदूर तालुक्यात ८ तलावांचा समावेश करण्यात आला. या तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे ठरविण्यात आले. यासाठी कुठलाही निधी खर्च न करता संपूर्ण लोकसहभागातून ५२ तलावातून ४५ हजार ३७ घनमीटर गाळ काढण्यात आला. काढलेला गाळ ६७० हेक्टर मध्ये टाकण्यात आला.भंडारा तालुक्यात १७ हजार ८५५ घनमीटर, पवनी ६ हजार १ घनमीटर, तुमसर ४ हजार १५७ घनमीटर, मोहाडी २ हजार ३४४ घनमीटर, साकोली ७८३, लाखनी ५ हजार १६ घनमीटर व लाखांदूर ८ हजार ८८० घनमीटर गाळ काढला असून हा गाळ भंडारा तालुक्यातील २५० हेक्टर, पवनी ३९ हेक्टर, तुमसर ७९ हेक्टर, मोहाडी ४७ हेक्टर, साकोली २२ हेक्टर, लाखनी १२२ हेक्टर व लाखांदूर १०९ हेक्टर क्षेत्रावर हा गाळ टाकण्यात आला. या मोहीमेत जिल्ह्यातील ७३७ शेतकºयांनी सहभाग नोंदविला.गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार या योजनेत जिल्ह्यात झालेले काम लोकसहभागातून करण्यात आले असून यासाठी शासनाचा कुठलाही निधी खर्च झालेला नाही. यावर्षी कमी वेळ मिळाला असला तरी चांगले काम झाले आहे. पुढील वर्षाचे नियोजन आतापासून करण्यात येणार असून ज्या तलावांचा लाभ सिंचनासाठी जास्त होणार आहे. अशा तलावांची यादी तयार करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. त्याच तलावातील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे सिंचनाला निश्चितच लाभ होईल.- सुहास दिवसे, जिल्हाधिकारी .