शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेला ५ हजारांचा दंड

By admin | Updated: January 25, 2017 00:34 IST

बँकेत कार्यरत असताना आरबीआय नागपुरच्या शाखेत १७ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा जमा केल्याचा ठपका ...

जिल्हा ग्राहक मंचचा आदेश : सूचना न देता कापली रक्कमभंडारा : बँकेत कार्यरत असताना आरबीआय नागपुरच्या शाखेत १७ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा जमा केल्याचा ठपका ठेवून कर्मचाऱ्याच्या खात्यातून तेवढी रक्कम सूचना न देता कापण्यात आली. या प्रकरणी त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेत न्याय मागितला. प्रकरणाची शहानिशा करून जिल्हा ग्राहक मंचाने सदर स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा भंडाराला ५ रुपयांचा दंड ठोठावला आहे.माहितीनुसार, येथील सत्कार नगरातील रहिवासी वसंतराव नेवारे हे भंडारा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते बँकेत वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते. ३० जून २०१५ रोजी ते सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी ७ फेब्रुवारी २०१५ रोजी वसंतराव नेवारे यांनी बँकेतील १२ कोटी ९९ लक्ष २५ हजार रुपयांच्या खराब नोटा रिझर्व बँक आॅफ इंडिया नागपूर येथे नेऊन जमा केल्या. त्यावेळी आरबीआयने तपासणी करून त्या स्वीकारल्या. नोकरीत असेपर्यंत सदर रकमेबाबत स्टेट बँक किंवा आरबीआयकडून कुठलीही तपासणी किंवा शहानिशाबाबत पाचारण करण्यात आले नाही. सबब वसंतराव नेवारे व त्यांची पत्नी प्रभावती यांचे स्टेट बँक आॅफ इंडिया भंडाराच्या शाखेत ११२४४८०७४८१ असे बचत खाते आहे. या दरम्यान बँकेने त्यांच्या बचत खात्यातून १७ हजार ५०० रुपये कपात केले. तसेच ही रक्कम आरबीआयमध्ये जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांपैकी १७ हजार ५०० रुपयांच्या नोटा बनावटी असल्याचे कारण दिले. विशेष म्हणजे सदर रक्कम खात्यातून कपात केल्याची सूचनाही नेवारे यांना देण्यात आलेली नाही. याबाबत नेवारे यांनी बँकेशी संपर्क साधून सदर रक्कम परत देण्याची मागणीही केली. मात्र ती मागणी पूर्ण न झाल्याने शेवटी नेवारे यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. ग्राहक मंचाने प्रकरणाची शहानिशा करून व दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. यात नेवारे यांनी सादर केलेले पुरावे वस्तूस्थितीला ग्राह्य धरून त्यांची तक्रार मंजूर करण्यात आली. यात शेवटी ग्राहक मंचाने आदेश देत तक्रारकर्त्याच्या बचत खात्यात १७ हजार २५० रुपयांची रक्कम २३ जुलै २०१५ पासून ९ टक्के व्याजासकट देण्यात यावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी ३ हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी २ हजार रुपये देण्याचा आदेशही ग्राहक मंचाने सुनावला. आदेशाची पूर्तता एक महिन्याच्या आत करण्याचेही आदेश देण्यात आले. सदर निर्णय ग्राहक मंचाचे अध्यक्ष मनोहर चिलबुले यांनी दिला. तक्रारकर्त्याकडून अ‍ॅड.एम.जी. हरडे, अ‍ॅड.वाय.जी. निर्वाण यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)