शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

'त्या' ५ गावांना मे हीटमध्ये ५ लक्ष लिटर पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: May 13, 2016 00:24 IST

तालुक्यात ‘मे हीट’मध्ये पाणी नाही म्हणून ओरड सुरू आहे. बावनथडी धरणातून पाणी सोडण्यात आले तर दुसरीकडे डोंगरी बु.

शुभ वर्तमान : डोंगरी बु. मॉईल प्रशासन व ग्रामपंचायत डोंगरीचा स्तुत्य उपक्रममोहन भोयर तुमसरतालुक्यात ‘मे हीट’मध्ये पाणी नाही म्हणून ओरड सुरू आहे. बावनथडी धरणातून पाणी सोडण्यात आले तर दुसरीकडे डोंगरी बु. मॉईल प्रशासन व डोंगरी बु. ग्रामपंचायतच्या योग्य नियोजनामुळे पाच गावांना दररोज पाच लक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. तालुका प्रशासनाने पाण्याचे नियोजन कसे करावे याचा येथे धडा घेण्याची गरज आहे.तालुका मुख्यालयापासून ३५ कि़मी. अंतरावर डोंगरी बु. गाव आहे. याच गावाजवळ भारत सरकारची लोहखनिज मॅग्नीज खाण आहे. डोंगरी बु. गावासह परिसरातील पवनारखारी, गोबरवाही, बाळापूर, देवनारा या गावात उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायत स्वत: पाणी टंचाई दूर करण्याकरिता सक्षम नाही. तेवढा निधी गावांना मिळत नाही. प्रशासनाकडून पाणी टंचाई दूर करण्याकरिता उपाययोजना केली जाते, परंतू त्यालाही काही मर्यादा असते. डोंगरी बु. येथे जूने तलाव आहे. जमिनीत पाण्याचा साठा येथे मुबलक आहे. जलकुंभाजवळ डोंगरी बु. मॉईल प्रशासनाने ५ कुपनलिका तयार केल्या. याकरिता ग्रामपंचायत डोंगरी बु. चे सहकार्य मॉईल प्रशासनाला मिळाले.डोंगरी बु. मॉईलचे खाण व्यवस्थापक आर.यु. सिंग व डोंंगरी बु. चे उपसरपंच राजू तोलानी यांच्यात पाणी टंचाई विषयी चर्चा झाली. खाण व्यवस्थापक आर.यु. सिंग यांनी मॉईलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या नियोजनाची माहिती दिली. मॉईल प्रशासनाने याकरिता हिरवी झेंडी दिली. नंतर ५ कुपनलिका तयार करण्यात आल्या. या कुपनलिकेला भरपूर पाणी आहे. दररोज ५ गावांना ५ लक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची क्षमता या कुपनलिकेत आहे.पाणीटंचाई असलेल्या डोंगरी बु. पवनारखारी, बाळापूर, देवनारा, गोबरवाही या गावांना मुबलक पाणी मिळत आहे. वाळवंटात पाणी शोधल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद स्थानिक नागरिकासह परिसरातील जनतेला झाला आहे. या परिसरात मॅग्नीज असल्याने परिसर खडकाळ आहे. त्यामुळे पाण्याचा साठा परिसरात कमी आहे, परुं कुपनलिकांना मुबलक पाणी असल्याने पाणी टंचाईवर येथे मात केली जात आहे. योग्य नियोजनामुळे तथा ग्रामपंचायत पदाधिकारी व खाण व्यवस्थापकांची दूरदृष्टी येथे यशस्वी झाली.