लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मध्यप्रदेशातून नागपूर येथे जाणारा पाच लाख रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे बुधवारी करण्यात आली. आंतरराज्यीय सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याचे यामुळे उघड झाले.मध्यप्रदेशातील बालाघाट येथून सुगंधीत तंबाखूची चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरुन तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांनी सापळा रचला. त्यावेळी ट्रक क्रमांक एमपीएच ८४० येत होता. त्या ट्रकला थांबवून चौकशी केली असता. त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात सुगंधित तंबाखू आढळून आला. ११८८ किलो सुगंधित तंबाखू या ट्रकमध्ये होता. त्याची किंमत चार लाख ७५ हजार २०० रुपये एवढी आहे. या प्रकाराची माहिती भंडारा येथील अन्न व पुरवठा विभागाला देण्यात आली. पुरवठा विभागाचे सहायक आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी बी.जे. नंदनवार, नमुना सहायक निलकंठ बारसाकडे तुमसर ठाण्यात दाखल झाले. त्यांनी अन्न पुरवठा मानद कायद्यानुसार कारवाई करुन सुगंधीत तंबाखूचे नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविले. क्रेज नावाची ही तंबाखू हूक्का, मावा, सिगारेट तथा ड्रग्ज मध्ये उपयोगात आणली जात असल्याची माहिती आहे. तंबाखू पाकीटावर गुजरात राज्यात पाकीट सीलबंद झाल्याचे नमूद आहे. सदर ट्रक तुमसर पोलीस ठाण्यात जप्त करुन लावण्यात आला आहे.
पाच लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:52 IST
मध्यप्रदेशातून नागपूर येथे जाणारा पाच लाख रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे बुधवारी करण्यात आली. आंतरराज्यीय सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याचे यामुळे उघड झाले.
पाच लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
ठळक मुद्देतुमसर येथे कारवाई : भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई