आज जागतिक एड्स दिन : मृतांमध्ये १३७ महिला, ४० हजार व्यक्तींची तपासणीभंडारा : एचआयव्ही तपासणी केंद्राच्या माध्यमातून सन २००२ ते आॅक्टोंबर २०१४ पर्यंत ४० हजार ३०५ व्यक्तींचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यात २१६ पुरूष तर १५ गर्भवती महिला बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षात ४९३ बाधीतांचा मृत्यू झाल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. असून त्यात ३३४ पुरूष तर १३७ महिलांचा समावेश आहे.शासनाकडून एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्रम ग्रामीण भागातील तळागळातील नागरिकांपर्यंत पोहचता यावा यासाठी राबविण्यात येत आहे. कलापथक, माहिती शिक्षण व संवाद पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृतीवर लाखोंचा खर्च करण्यात येत असला तरी यात बाधितांची संख्याही कमी नाही. आजमितीस जिल्ह्यात ५१ एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र (आयसीटीसी) आहेत. सन २००९ ते आॅक्टोंबर २०१४ पर्यंत जिल्ह्यात ३ हजार ४०३ व्यक्तींची नोंदणी करण्यात आली. त्यात २ हजार ५९६ व्यक्तींवर औषधोपचार करण्यात आले. यातील ४९३ एचआयव्ही बाधितांचा मृत्यू झाल आहे. यात ३३४ पुरूषांचा १३७ महिलांचा तर २२ बालकांचा समावेश आहे. सन २०१३-१४ च्या नोंदिनुसार ३५ ते ४९ वयोगटातील १३८ , २५ ते ३४ वयोगटातील ७२, ५० वयोगटातील २६, १५ ते २४ वयोगटातील २० तर १४ वयोगटातील १४ बालकांचा एचआयव्ही बाधितांमध्ये समावेश आहे.सन २००२ ते आॅक्टोंबर २०१४ पर्यंत ४० हजार ३०५ व्यक्तींची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यात २० हजार ९९२ पुरूष तर १९ हजार ३१३ गर्भवती मातांचा समावेश आहे. यातील २३१ व्यक्तींना एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यात २१६ पुरूष तर १५ गर्भवती मातांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात ५ वर्षांत ४९३ एचआयव्ही बाधितांचा मृत्यू
By admin | Updated: November 30, 2014 22:58 IST