शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षात ४८५ क्षयरुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: March 24, 2015 00:11 IST

जिल्ह्यात मागील सहा वर्षात ४८५ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देवानंद नंदेश्वर  भंडाराजिल्ह्यात मागील सहा वर्षात ४८५ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सन २००९ मध्ये सर्वात अधिक १०८ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला. सहा वर्षाची आकडेवारी लक्षात घेतली असता जिल्ह्यात ७ हजार ६४६ रुग्ण या आजाराने बाधीत झाले. यातील ५ हजार २०६ रुग्ण औषधोपचारानंतर सुधारित झाली.क्षयरोग हा एक जीवघेणा आजार म्हणून प्राचिन काळापासून प्रचलीत आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या आजारावर प्रभावी औषधी उपलब्ध झाली. भंडारा जिल्ह्यात ८ एप्रिल २००२ पासून सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या अंतर्गत दोन थुंकी (ठसे) तपासून आजाराचे निश्चित निदान करण्यात येते. ही तपासणी विनामूल्य असते. जिल्हा क्षयरोग केंद्र भंडारा, उपजिल्हा रुग्णालय साकोली, तुमसर, ग्रामीण रुग्णालय पवनी, मोहाडी, लाखांदूर, सिहोरा, अड्याळ, पालांदूर. प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर, लाखनी, जांब, गोबरवाही, कोंढा, सानगडी या ठिकाणी क्षय आजाराचे निदान करण्यात येते. मागील सहा वर्षांची आकडेवारी लक्षात घेता सन २०१३ मध्ये १०५ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला. याची टक्केवारी ०८.०५ एवढी आहे. यावर्षी मार्च महिन्यापर्यत ३२० रुग्ण क्षयरोगाने बाधित असल्याचे आढळून आले. सन २०१२ मध्ये सर्वाधिक १,४०६ रुग्ण बाधित झाले. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी क्षयरुग्णापर्यत पोहचण्यात मिळून सगळे एकत्र, निदान उपचार आणि काळजी हेच सर्व क्षयरुग्णांना बरे करण्याचे सुत्र' असे घोषवाक्य दिले आहे. क्षयरोग दिनी येथील सार्वजनिक वाचनालयात सकाळी १० वाजता आजाराविषयी माहिती देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.१०७ अतिसंसर्गजन्य क्षयरुग्ण डॉट्सचा औषधोपचाराचा कालावधी वर्षभराचा असल्यामुळे सन २०१४ मध्ये रुग्ण शोधण्यात आलेल्या क्षयरुग्णांचा 'आऊट कम' मार्च २०१५ पर्यंत येईल. जिल्ह्यात २००७ पासून अतिसंसर्गजन्य (एमडीआर टी.बी.) क्षयरुग्णांना औषधोपचार सुरू करण्यात आला. आजपर्यंत १०७ अतिसंसर्गजन्य क्षयरुग्णांचे निदान झाले. यातील ९२ रुग्णांवर या आजाराचा औषधोपचार सुरू करण्यात आला. यापैकी आजपर्यंत २२ रुग्णांमध्ये सुधारणा झाली आहे.