शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

४६५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:17 IST

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे दिसत नाही.

डिमांड भरुनही वीज जोडणी नाही : कृषिपंप जोडणीची घोषणा फसवी असल्याचा आरोपराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे दिसत नाही. मोहाडी तालुक्यात अनेक शेतकरी कृषी पंपाच्या वीज जोडणी प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.राज्यशासनाने शेतीसाठी वीज उपलब्ध करून देऊ, शेतकऱ्याला समृध्द, सधन व प्रगतशील करण्यासाठी कटीबध्द आहे, असे सांगितले जाते. परंतु शेतीसाठी मागेल त्याला वीज हे आश्वासन फसवी असल्याचे दिसून आले आहे. मोहाडी तालुक्यात १५ जून २०१६ म्हणजे एक वर्षापासून ४६५ कृषीपंपाच्या वीज कनेक्शनची वाट शेतकरी बघत आहेत. दररोज कृषी पंपाच्या जोडणीसाठी अर्ज येत असतात. त्यामुळे हा आकडा दररोज वाढत आहे. भंडारा जिल्ह्याचा हा आकडा २६०० च्यावर पोहोचला आहे. धडक सिंचन विहिरी, मनरेगातून तयार होणाऱ्या विहीरींमध्ये पाणी जमा झाले. परंतु ते पाणी शेतीसाठी ओढायचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. डोळ्यादेखत धानाचे पऱ्हे कोमेजले आहे. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. परंतु आडात असूनही धान पऱ्ह्यांना शेतीसाठी पाणी सिंचीत करता येत नसल्याचे शेतकऱ्यांना शल्य आहे. वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांच्या पैसा एक वर्ष शासनाच्या तिजोरीत पडूनही वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे हेच काय अच्छे दिन असे म्हणण्याची पाळी आली आहे.एका पाण्यासाठी पीक गेल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी अनेकवेळा घेतला आहे. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला कृषीपंपाचे कनेक्शन अशी घोषणा हवेत विरली आहे. शासन शाश्वत कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळवून देण्यासाठी अपयशी ठरला आहे.याबाबत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता, कृषीपंपाचे वीज जोडणी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यासाठी निधी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. निधी नसल्यामुळे एक वर्षापासून वीज जोडणीची कामे ठप्प आहेत. वीज जोडणीच्या कामासाठी भंडारा जिल्ह्यासाठी पाच कोटी रूपयाची आवश्यकता असल्याची माहिती आहे. निधी नसल्याने निविदा निघाल्या नाहीत. त्यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीची कामे रखडली आहे. अन्य जिल्ह्यात कृषीपंपाच्या वीज जोडणीची कामे सुरू असताना भंडारा जिल्ह्यासाठी निधी नसणे, हे आश्चर्य आहे. एक वर्षापाूसन शेतकरी कृषी पंपाचे वीज कनेक्शन मिळावे यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात पायपीट करून थकले आहेत. परंतु या गंभीर विषयाची दखल कुणीही घेतलेली नाही. सरकारात असणारे, नसणारे दोनही पक्षातील नेते म्हणतात, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. पण, सगळ्याच शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन या संवेदनशिल विषयाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. शासनाचे धोरण शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला जात आहे. शेतकऱ्यांनी वीज, पाण्याशिवाय शेती कशी करावी?-राजेश लेंडे, सरपंच ग्रामपंचायत मोहगाव देवीआधी विहिरीच्या कामासाठी आता वीज जोडणीसाठी चकरा किती पायपीट करायची. पऱ्हे व रोवणी कशी करायची असा प्रश्न आहे.- रामप्रसाद वहिले, शेतकरी, कान्हळगाव/सिरसोलीवीज कनेक्शनबाबत कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही. कंत्राटदाराकडून वीज जोडणीची कामे करता येत नाही.- मंगेश कहाळे, उपविभागीय अभियंता, मोहाडी.