शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

४६ हजार हेक्टरमधील पीक धोक्यात

By admin | Updated: January 16, 2017 00:22 IST

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४६ हजार १५७ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

फटका वातावरण बदलाचा : रबीची १०१ टक्के पेरणीदेवानंद नंदेश्वर भंडारावातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४६ हजार १५७ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झालेली आहे. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत. यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ७५८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले. शेतकऱ्यांनी आतापर्यंत १०१ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४६ हजार १५७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. यावर्षी आजपर्यंत गहू पिकाची १०,३४५ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली. हरभरा १०,११३ हेक्टर, लाख-लाखोळी ९ हजार ३९९, पोपट ७९३, वटाना ७८१, उडीद व मुंग एक हजार ९५, इतर कडधान्य ४ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली.जवस १ हजार ९९६, मोहरी ११७, तीळ २, एकूण गळीत धान्य २ हजार १५८ हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. भाजीपाला २ हजार ५६७ हेक्टर, बटाटा ९८, मिरची ९८४ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली.कृषी विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रब्बी पिकासाठी ७ हजार ६५७ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी ६ हजार ५६६ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे. पवनी तालुक्यात ९ हजार २५७ हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी १२ हजार ६१५, मोहाडी ३ हजार ७९४ पैकी ५ हजार ६०४, तुमसर ५ हजार ४७० हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार १४५ हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची लागवड करण्यात आली आहे. साकोली तालुक्यात ३ हजार ४१५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ४०६, लाखांदूर तालुक्यात ८ हजार ४२३ हेक्टर क्षेत्रापैकी ७ हजार ५५७ हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ५ हजार ७४२ हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार २३६ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात मका, सुर्यफुल, करडई, या रबी पिकाची लागवड करण्यात आली नाही.