शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विदेशातून ४३ व्यक्ती दाखल, कुणालाही संसर्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात अबुधाबी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, टान्झानिया, स्विडन या देशांतून ही मंडळी दाखल झाली आहेत. आफ्रिका खंडात या व्हेरिएंटचा संसर्ग पुढे आल्याने तेथून आलेल्यांवर करडी नजर आहे. टान्झानिया येथून एक व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाली असून, ती हायरिस्क देशातून आली असल्याने त्याच्यावर प्रशासनाची करडी नजर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्या व्यक्तींवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असून, भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून ४३ व्यक्ती विविध देशांतून दाखल झाल्या आहेत. यापैकी १३ व्यक्ती परत परदेशात गेल्या होत्या. सहा व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता ते निगेटिव्ह आले आहेत.भंडारा जिल्ह्यात अबुधाबी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, टान्झानिया, स्विडन या देशांतून ही मंडळी दाखल झाली आहेत. आफ्रिका खंडात या व्हेरिएंटचा संसर्ग पुढे आल्याने तेथून आलेल्यांवर करडी नजर आहे. टान्झानिया येथून एक व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाली असून, ती हायरिस्क देशातून आली असल्याने त्याच्यावर प्रशासनाची करडी नजर आहे.

शहरात एक,  ग्रामीणमध्ये ४२

- जिल्ह्यात परदेशातून दाखल झालेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती शहरी असून उर्वरित सर्व ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणा या सर्वांवर नजर ठेवून आहे. कुणालाही संसर्ग नसल्याचे आढळून आले.

सहा जणांची टेस्ट,  सर्व निगेटिव्ह- परदेशातून दाखल झालेल्या ४३ पैकी सहा व्यक्तींचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सहाही व्यक्तींचे नमूने निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा  निश्वास सोडला आहे.

हायरिस्क देशांतून एक व्यक्ती दाखल- हायरिक्स असलेल्या ऑफ्रीका खंडातील टांझानिया देशातून एक व्यक्ती भंडारा जिल्ह्यात दाखल झाला. त्याचा नमूना तपासणीसाठी पाठविला असता तो निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.

खबरदारीच्या उपाययोजना- ओमायक्रॉन व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. नागरिकांना मास्क सक्तीचा करण्यात आला असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश दिले. आहे. - प्रवासात कोरोनाच्या दोन लसी घेतलेल्या व्यक्तींना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच प्रवासातही मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. - बाजारपेठेत नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे.

विमानतळावर चाचणी झाली पुढे काय?

- परदेशातून आलेल्या व्यक्तींची विमानतळावर चाचणी केली जाते. त्यानंतर जिल्ह्यात दाखल झाल्यावर आरोग्य विभागही त्यांच्यावर करडी नजर ठेवून - भंडारा जिल्ह्यात तुमसरमध्ये तीन आणि मोहाडी तालुक्यात एक असे चार व्यक्ती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अबूधाबीवरून दाखल झाले. ते सर्व निगेटिव्ह आहे.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या