शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूर व अतिवृष्टीत जलसंधारण विभागाचे 43 बंधारे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 21:54 IST

जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचनाची सोय वाढावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेतून नाल्यांवर सिमेंट प्लग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधारे, मामा तलावांचा समावेश आहे. यामुळे एका पाण्याचा दुष्काळ संपला. तसेच भूगर्भातील जलसाठा वाढला. सिंचनाच्या जाळ्यांमुळे शेतीच्या उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याला ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जलसंधारण विभागाचे ४३ बंधारे उद्ध्वस्त झाले असून, त्यात मामा तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे व साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे चार कोटी ९० लाख ५० हजारांचे नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील सिंचन अडचणीत सापडले आहे. जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचनाची सोय वाढावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेतून नाल्यांवर सिमेंट प्लग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधारे, मामा तलावांचा समावेश आहे. यामुळे एका पाण्याचा दुष्काळ संपला. तसेच भूगर्भातील जलसाठा वाढला. सिंचनाच्या जाळ्यांमुळे शेतीच्या उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली. मात्र, मात्र अनेक वर्षांपासून देखभाल-दुरुस्ती करण्यात आली नाही. दरवर्षी पूर व अतिवृष्टीचा फटका बसतो आहे. यंदा तीनदा पूर व अतिवृष्टीची झळ बंधाऱ्यांना बसली. यामुळे नाल्यांवर बांधलेल्या बंधाऱ्याचे व तलावांचे मोठे नुकसान झाले. जलसंधारण विभागाच्या सर्वेक्षणात ४३ सिमेंट पल्ग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे.मामा तलावांना अतिक्रमणाचा विळखाजिल्ह्यातील जुने मालगुजारी (मामा) तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. यामुळे सिंचन क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. तलावांच्या जागेवर अनेकांनी शेती केल्याने तसेच सिंचन क्षमतेवर परिणाम होण्यासोबत जलसाठ्यातही मोठी घट झाली आहे. अनेकांनी घरांचे बांधकाम तलाव क्षेत्रात केले आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे मासेमारी व्यवसाय संकटात सापडले असून अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.

गावनिहाय नुकसानग्रस्त बंधारे व तलाव- जांभोरा, झबाडा, हरदोली, नेरी, विहीरगाव, सिंदपुरी, देव्हाडी, धुटेरा, पिटेसूर बोडी, गर्रा, तुडकापुरी, आतेगाव, उकारा, नेरला, निष्टी, सोनेगाव, वाही, कान्हळगाव येथील मामा तलावांचा समावेश आहे. महालगाव, मलिंदा, कान्हळगाव, चिचोली, आंधळगाव, पिंपळगाव, सीतेपार, विहीरगाव, लोभी, साकोली, खापरी रेहपाडे येथील साठवण बंधारे, करडी, आंधळगाव, सानगडी, सोनेगाव येथील कोल्हापुरी बंधारे, निलागोंदी, गोंडीशिवनाला येथील लघू पाटबंधारे तलाव तर भावड येथील सिमेंट प्लग बंधाऱ्याचा समावेश आहे.

नुकसानीचा शासनाला अहवाल- पूर व अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे चार कोटी ९० लाख ५० हजारांचे नुकसान झाले. निधीच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे. शासनाकडून काय मदत मिळते, केव्हा बंधाऱ्यांची दुरुस्ती होते, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

नुकसानग्रस्त बंधाऱ्यांच्या  दुरुस्तीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविला. निधीअभावी अडचणी वाढल्या आहेत. निधीची पूर्तता होताच नियोजनानुसार तलाव बंधारे यांच्या सुधारणा व दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ केला जाईल.- सुभाष कापगते, जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.

 

टॅग्स :floodपूर