५०७ रुग्णांवर शस्त्रक्रिया : निर्मूलनासाठी कोरडा दिवस पाळाभंडारा : आॅगस्ट २०१४ मध्ये हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ३ हजार ७३३ हत्तीरोग रुग्ण व ६९८ अंडवृध्दी रुग्ण असे एकूण ४ हजार २३१ हत्तीरोग रुग्ण आढळले आहे. या रुग्णांना नियमित औषधोपचार सुरु आहेत. अंडवृध्दी रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येवून सन २०१४-१५ मध्ये ५०७ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हत्तीरोगविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपाय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांच्या सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेण्याचे दृष्टीने विविध उपक्रमाद्वारे माहिती पोहचविण्यात येते. गावातील ग्रामस्थांनी आठवडयातून एका निश्चित दिवशी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)प्रतिबंधात्मक उपायहत्तीरोग नियंत्रणासाठी जनतेने गावातील गटारे आणि नालीमधील साचलेले पाणी वाहते करणे, शोषखड्यांद्वारे पाण्याचा निचरा करणे, अनावश्यक खड्डे, माती, दगड टाकून बुजवून टाकणे, घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावे, डासापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बांधणे, घरातील बाहेरच्या उपयोगासाठी पाणी साठवून ठेवण्याच्या टाकी, मडके, रांजन, माठ आदी मध्ये साठवून ठेवलेले पाणी फेकुन रिकामी करुन ती स्वच्छ करावी. अशा प्रकारे गावात प्रत्येक घरी आठवड्यातून एका निश्चित दिवशी कोरडा दिवस पाळावा. जिल्ह्यात हत्तीरोग नियंत्रणाकरिता पथक कार्यरत असून भंडारा शहर, भंडारा ग्रामीण, मोहाडी, आंधळगाव, पहेला, अडयाळ, पवनी असे सात उपपथक व करडी, पालांदूर व लाखांदूर असे तीन रात्र चिकित्सालय कार्यरत आहेत. या उपपथकांतर्गत १० टक्के लोकसंख्येचे वर्षातून एकदा रक्त नमुने तपासणी करण्यात येते. दूषित रुग्णांना औषधोपचार करण्यात येते. अळीनाशक फवारणी कार्यक्रम राबविण्यात येतो.
वर्षभरात ४,२३१ हत्तीरुग्ण
By admin | Updated: June 7, 2015 00:51 IST