शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय गुणवत्ता तपासणीसाठी आता ४० पथके

By admin | Updated: January 14, 2015 23:02 IST

जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी याकरिता राज्य शासनाने आमची शाळा आमची मुले उपक्रम राबविण्याचा आदेश काढला होता. भंडारा जिल्ह्यात या उपक्रमाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.

मोहन भोयर - भंडारा जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी याकरिता राज्य शासनाने आमची शाळा आमची मुले उपक्रम राबविण्याचा आदेश काढला होता. भंडारा जिल्ह्यात या उपक्रमाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करण्याचा निर्णय घेऊन ४० पथक तयार केले. समाधानकारक कार्य न करणाऱ्या शिक्षक व गट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी व लाखनी येथील गट शिक्षणाधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे, हे विशेष.जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून राहून इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आव्हान देण्याची क्षमता तयार व्हावी याकरिता आमची शाळा आमची मुले हा गुणवत्ता वाढ उपक्रम राबविण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला होता. जिल्ह्यात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला नाही. कागदोपत्री अहवाल पाठवून पूर्तता करण्यात आली होती.याची दखल जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रमेश पारधी यांनी घेतली. त्यांनी मासीक सभेत शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करण्याचा निर्णय घेतला. याकरिता तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत ४० पथके तयार केले. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाली आहे. समाधानकारक कार्य न केल्याचा ठपका तुमसर, मोहाडी, लाखनीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखून कारवाई करण्यात आली. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पथकाला दिसली नाही. त्या शिक्षकाची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. प्रत्येक शाळांचा गुणवत्ता तपासणीत तालुका व जिल्हास्तरावर ४० पथके तयार करण्यात आले आहे. तालुकास्तरीय पथकात केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्हास्तरावरील पथकात उपशिक्षणाधिकारी पथकाचे प्रमुख असून जिल्हास्तराचे शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तालुका व जिल्हा तपासणी पथकाचे येथे क्रास तपासणी होणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.