शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 00:27 IST

करडी परिसरातील ७ गावांसाठी ४ कोटी रूपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंदस्थितीत आहे.

जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष : करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनायुवराज गोमासे करडी (पालोरा)करडी परिसरातील ७ गावांसाठी ४ कोटी रूपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंदस्थितीत आहे. ही योजना सुरू करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले असले तरी प्रयत्न व्यर्थ ठरले. परिणामी नागरिक शुध्द पाण्यापासून वंचित आहेत. चार वर्षापासून कर्मचारी वेतनाविना आहेत. पाणी शुद्धीकरण यंत्रणा भंगारात निघाली आहे. करडी परिसरातील ७ गावांना शुद्ध पाणी पुरविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. या योजनेसाठी चार कोटी रूपयांचा निधी खर्च झाला. या योजनेत करडी, मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, देव्हाडा, नरसिंगटोला, मोहगाव, नवेगाव आदी गावांचा समावेश होता. मात्र योजनेचा खर्च पेलणारा नाही, या कारणास्तव करडी गावाने योजनेतून नाव मागे घेतले. त्यामुळे उर्वरित लहान गावांच्या माथ्यावर योजना मारण्यात आली. ही योजना सन २००९ मध्ये तयार होऊन सन २०११ पर्यंत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. अखेर २०१२ मध्ये लोकार्पण करण्यात आले. योजना सुरु होवून जेमतेम कालावधी लोटत नाही, तोच विद्युत बिल व देखरेखीचा मोठा बोझा पडल्याने निधीच्या उपलब्धतेअभावी योजना बंद पडली. पुन्हा निधीसाठी जिल्हा परिषदेने मदत दिल्याने योजना कार्यान्वीत झाली. परंतु पुन्हा महिन्याभरानंतर ४ कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी असहकार आंदोलन पुकारल्याने योजना बंद पडली, ती कायमचीच. त्यानंतर योजना सुरू झाली नाही.बांधकाम होऊन तीन ते चार महिने सुरु राहिली. ही योजना बंद झाल्याने यंत्रणा भंगारात निघाल्यानंतर ही योजना सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले. तुमसर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी बावनकर यांनी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. परंतु उपयोग झालेला नाही. सन २०१२ मध्ये ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरित केल्याचे सांगण्यात आले. योजनेच्या संचालनासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत तत्कालीन उपसभापती उपेश बांते यांचे अध्यक्षतेखाली शिखर समिती गठित करुन योजना सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु शिखर समितीसुद्धा योजना चालविण्यात अपयशी ठरली.चार गावांचे नुकसानयोजना ७ गावांसाठी तयार करण्यात आली. परंतु यातील तीन गावांनी खर्च झेपणारा नसल्याची बाब समोर केली आहे. निलज बुज, निलज खुर्द, मोहगाव, नवेगाव अद्यापही योजना सुरु करण्याची मागणी करीत आहेत. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत अमानत रक्कम व नळ जोडणीसाठी बांधकाम करुन घेतले आहे. मात्र योजना सुरु करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पं.स. सदस्य महादेव पचघरे यांनी केला.योजना सुरु करण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊन ही मागणी करण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने चार कोटी रूपयांची योजना भंगारात निघाली आहे. शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित असल्याचे निलजचे सरपंच किशोर माटे यांनी सांगितले.