संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : हत्तीपाय रोग समुळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून नुकत्याच राबविलेल्या हत्तीरोग रुग्ण शोध मोहीमेत साकोली तालुक्यात ३६४ रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागातर्फे मोफत औषधी वितरण केली जात असली तरी या रुग्णात वाढ होत असल्याचे धानपट्ट्यात दिसून येते.साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानशेती केली जाते. जून महिना लागला की पºहे टाकले जातात. त्यानंतर शेतीची मशागत केली जाते. पाऊस पडला की धानाची रोवणी सुरू होते. ही कामे चिखलातच करावी लागतात. धानपाणी शेतात असते. हे वातावरण क्युलेक्स डासांच्या मादीस पोषक आहे. त्यामुळे धानपट्ट्यात हत्तीपायाचे रुग्ण दिसून येतात. दवर्षी १६ ते ३१ आॅगस्ट या कालवधीत हत्तीपाय रुग्ण शोध मोहीम राबविले जाते. या मोहिमेत गत वर्षीचे ३६० रुग्ण व यावर्षीचे चार नवीन रुग्ण असे ३६४ रुग्ण आढळून आले. तालुक्यात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकामार्फत सर्व्हेक्षण व जनजागृती करणे सुरू असते.डासांचा चावा टाळणे हाच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आहे. वाढत्या हत्तीपायाच्या रोगाला टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे.हत्तीपाय रोग दुरीकरण मोहीम२५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत हत्तीपाय रोग दुरीकरणासाठी सामूहिक औषधोपचार मोहीम राबविली गेली. या मोहिमेअंतर्गत हत्तीरोग जंतूविरोधी डीईसी औषधासोबतच जंतू नाशक अल्बेंडाझोल या औषधाची मात्रा खायची आहे. २००४ पासून सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहीम सुरू आहे. हे कर्मचारी घरोघरी जावून वयोगटानुसार गोळ्यांचे वाटप करतात.अशी घ्या काळजीहत्तीरोगाचा प्रसार करणारे क्युलेक्स डास, घाण पाणी, गटारे, खड्डे, नाल्यात तयार होतात. हत्तीपाय रोगाचे प्राबल्य कमी करण्यासाठी शौचालयाच्या व्हॅट पाईपला जाळ्या बांधाव्यात. डासोत्पत्ती भागात डासअळी भक्षक गप्पी मासे सोडावेत, झोपताना मच्छरदानीचा उपयोग करावा, अंगभर कपडे घालावे अथवा पांघरून झोपावे, डासाच्या चाव्यापासून स्वत:चे रक्षण करावे, उघड्या त्वचेवर डासप्रतिबंधक लावावे.
साकोली तालुक्यात हत्तीपायाचे ३६४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:51 IST
हत्तीपाय रोग समुळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून नुकत्याच राबविलेल्या हत्तीरोग रुग्ण शोध मोहीमेत साकोली तालुक्यात ३६४ रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागातर्फे मोफत औषधी वितरण केली जात असली तरी या रुग्णात वाढ होत असल्याचे धानपट्ट्यात दिसून येते.
साकोली तालुक्यात हत्तीपायाचे ३६४ रुग्ण
ठळक मुद्देजनजागृतीची गरज : धानपट्ट्यात रुग्णांचे प्रमाण अधिक