शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

३६,३१९ विद्यार्थ्यांची कसोटी पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 21:30 IST

इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता ...

ठळक मुद्देपरिक्षा बारावी व दहावीची: शिक्षण विभागाची तयारी पूर्ण, जिल्ह्यात दोन परिक्षा केंद्र संवेदनशिल

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत यंदा जिल्ह्यातून ३६ हजार ३१९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परिक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहे. विद्यार्थी दशेतील टर्निंग पॉर्इंट म्हणून समजली जाणाऱ्या या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचा कस पणाला लागला आहे. परिक्षा म्हटले म्हणजे अभ्यासाचे टेन्शन वाढत जाते. अशा स्थितीत पालकांसह शिक्षकगण व मार्गदर्शक विद्यार्थ्यांना अभ्यासाप्रती प्रोत्साहीत करीत असतात. मंडळाने काही महिन्यांपूर्वी बारावी व दहावी परिक्षेचे वेळापत्रक घोषित केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे नियोजनही सुरु होते. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परिक्षेला सुरुवात होणार असून यावर्षी जिल्ह्यातून १८ हजार ५७९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ६१ परिक्षा केंद्रामधून विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. यात विशेष म्हणजे बारावीचे सर्वाधिक परिक्षार्थी भंडारा तालुक्यातून आहेत. बारावी परिक्षेचा शेवटचा पेपर २० मार्च रोजी आहे. दहावीची परिक्षा १ मार्च पासून सुरु होणार असून यात १७ हजार ७४० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन परिक्षा केंद्र संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात सदर दोन्ही केंद्र मोहाडी तालुक्यातील असून १२ वीचे केंद्र म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल आंधळगाव व दहावीचे केंद्र असलेल्या कान्हळगाव येथील नवप्रभात हायस्कूलचा समावेश आहे. दहावीची परिक्षा २२ मार्च रोजी संपणार आहे. परिक्षेसाठी शिक्षण विभागाची पुर्ण तयारी झाली आहे. कॉपीमुक्त अभियानासाठीही शिक्षण विभागाने चांगलाच भर दिला आहे.