साकोली पोलीस ठाण्यातील घटना : अपघातात ५१ जखमी, ५३ गुन्हे दाखलशिवशंकर बावनकुळे साकोलीसाकोली पोलीस ठाणा अंतर्गत २०१३ ते २०१५ या तीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावर व इतर ठिकाणी वेगवेगळ्या अपघातात ३५ लोक मृत्यू पावले. ५१ लोक अपघातात जखमी झाले तर ५३ गुन्हे दाखल करण्यात आले.वर्ग २०१३ मध्ये अपघातात १५ लोक मृत्यूमुखी पडले. २६ जण जखमी झाले तर २६ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१४ मध्ये ८ लोक मृत्यूमुखी पडले तर ९ लोक जखमी झाले. १२ गुन्हे दाखल झाले. २०१५ मध्ये १२ जण मृत्यूमुखी पडले तर १६ जखमी झाले व १५ गुन्हे दाखल करण्यात आले.राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक, जमनापूर रोड, लाखांदूर रोड, नंदलाल पाटील कापगते विद्यालय समोील व बसस्टँड समोरील राष्ट्रीय महामार्ग हे वर्दळीचे ठिकाण आहेत. वाहतूक पोलीस काही ठिकाणी असतात तर काही ठिकाणी राहत नाही. सुसाट वेगाने वाहन चालविणे त्यामुळे त्याच्यावरील नियंत्रण सुटणे याच बरोबर शिस्त न पाळणे हे ही अनेक अपघातांना कारणीभूत ठरल्याचे महामार्ग पोलीस सांगतात. काही विद्यार्थ्यांना गाडी मोठ्या प्रमाणात चालविणे यात काही वेगळी मजा असते असे त्यांना वाटते. त्यातून अपघात होवून बळी जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
तीन वर्षांत ३५ जणांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:38 IST