शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

२० गावांसाठी १२७१ लाखांच्या ३४५ कामांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:24 IST

मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जलयुक्त शिवार अभियानाकडे पाहिले जाते. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्रत्येकी २० गावांप्रमाणे १४० गावांची निवड जलयुक्त शिवारासाठी झाली. मोहाडी तालुक्यात निवड झालेल्या २० गावांसाठी सहा विभागांच्या यंत्रणांमार्फत १२७१.८५ लाखांच्या ३४५ कामांचे नियोजन पूर्ण झाले. सदर कामांचे प्रस्ताव आराखडे वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले असून मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १४० गावांची निवड : नियोजनाला मंजुरीची प्रतीक्षा

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जलयुक्त शिवार अभियानाकडे पाहिले जाते. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्रत्येकी २० गावांप्रमाणे १४० गावांची निवड जलयुक्त शिवारासाठी झाली. मोहाडी तालुक्यात निवड झालेल्या २० गावांसाठी सहा विभागांच्या यंत्रणांमार्फत १२७१.८५ लाखांच्या ३४५ कामांचे नियोजन पूर्ण झाले. सदर कामांचे प्रस्ताव आराखडे वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले असून मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१५ पासूनच्या वाटचालीत आतापर्यंत एकाच वेळी १४० गावांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी प्रत्येक तालुक्यातील २० गावांचा समावेश जलयुक्त शिवार प्रोजेक्टमध्ये करण्यात आला. मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी आदी तालुक्यातील प्रत्येकी २० गावांत जलसंधारणांच्या कामांचा धडाका पहायला मिळणार आहे. २०१९ निवडणुकीचे वर्ष असल्याने अधिक गावांना या प्रकल्पात समाविष्ट केले असल्याचे बोलले जात आहे.मोहाडी तालुक्यातील २०१६-१७ मध्ये टंचाई घोषित व ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची निवड व कामांचे नियोजन आराखडे तयार करण्यात आले. ३४५ कामांच्या माध्यमातून ३४६ हेक्टर क्षेत्रावर १,१०६ टीसीएम पाणी साठा उपलब्ध होणार आहे.निवड झालेली गावेनिवड झालेल्या गावांमध्ये बोंद्री, धुसाळा, टाकळी, सिरसोली, रोहा, पाचगाव, सिहरी, जांभोरा, नेरला, वरठी, देव्हाडा खुर्द, केसलवाडा, सालेबर्डी, मोहगाव देवी, किसनपूर, लेंडेझरी, निलज बुज, निलज खुर्द, एलकाझरी, बिटेखारी आदींचा समावेश आहे.कृषी विभाग मोहाडीमोहाडी कृषी विभागामार्फत नियोजित आराखड्यांमध्ये भातखचरे १२ कामे, भातखचरे पुनर्जिवन ६४, शेततळे ३५, मातीचे नाला बांध २, बोडी नुतनीकरण ११, सिमेंट नाला बांध २४, सिमेंट नाला बांध दुरूस्ती ९, वळण बंधारा ४, वळण बंधारा दुरूस्ती ३, नाला खोलीकरण ५२ अशा एकूण २१७ काम यांचा समावेश आहे. ४४७, ९८ लाखांचा खर्चाचा लक्षांक असून २६७.२ हेक्टर मध्ये ५४२.४६ पाणीसाठा उपलब्ध होणार.जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागया विभागामार्फत सिमेंट नाला बांध १७, कोल्हापूरी बंधारे दुरूस्ती व खोलीकरण १, मामा तलाव दुरूस्ती व खोलीकरण १०, ल.पा. तलाव दुरूस्ती ६, पाझर तलाव दुरूस्ती २, अशा एकूण ३६ काम यांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. या कामांवर ६४८.७७ लाखांचा खर्च तर ४८१ टी.सी.एम. पाणी साठा करण्याचा लक्षांक आहे.जलसंधारण व वन विभागजलसंधारण विभागामार्फत साठवण बंधारा बांधकाम ३, मामा तलाव दुरूस्ती १ असे एकूण ४ कामांचे नियोजन आहे. यावर १००.८ लाखांचा निधी खर्च अपेक्षित असून ३७.७९ टी.एम.सी. पाणी साठा उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. वनविभागामार्फत पाणी साठवण तलाव ४, डीपीसीसीटी. ७, बोडी खोलीकरण १, नवीन बोडी १, सिमेंट बंधारा १ आदी १४ कामांचा समावेश आहे. यावर ४१.७३ लाखांचा निधी खर्च अपेक्षित असून ४२.१६ टीसीएम पाणी साठा उपलब्ध होणार आहे.