शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
4
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
5
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
6
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
7
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
8
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
9
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
10
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
11
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
12
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
13
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
14
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
15
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
16
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
17
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
18
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
19
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
20
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या

सामूहिक विवाह सोहळ्यात ३४ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: April 21, 2017 00:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता,

मोहरणा व पळसगाव येथे आयोजन : स्वत:च्या मुलीचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करण्याचा पटोले यांचा संकल्प लाखांदूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला-मुलींची लग्न लावून देणे काळाची गरज झाली आहे, असे आवाहन करीत आपल्या मुलीचेही लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करणार असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. मोहरणा येथील सर्वधर्मिय सामूहीक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे गुरूवारला ओबीसी व छावा संग्राम परीषदेच्यावतीने सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, भाजपचे वामन बेदरे, अ‍ॅड.वसंता एंचिलवार, सभापती मंगला बगमारे, पं.स. सदस्य शिवाजी देशकर, भरत खंडाईत, नगरसेव रामचंद राऊत, नुतन कांबळे, सभापती सुभाष राऊत, रामकृष्ण ठेंगरी, देवा पाटील राऊत, मनोहर महावाडे, ताराचंद मातेरे, दादाजी राऊत, सरपंच ग्रिष्मा राऊत, भायुमो सचिव जितेंद्र ढोरे, बाळु बुराडे, पवन समरत, सुभाष खिलवानी, वंदना ढोरे, अमर भानारकर, लोचन पारधी, उर्मिला राऊत संचालक, रूपाली राऊत ग्रा.पं.सदस्य, मनोरमा मोटघरे, गजानन शहारे उपस्थित होते.यावेळी खा.पटोले म्हणाले, मागील बारा वर्षांपासून हा सोहळा छावा संग्राम परीषदेच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. जनतेच्या आशिवार्दाने आपले विवाह सोहळे आजही चालुच आहेत. जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासुन कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, त्याचा फायदा जनतेला मिळणार आहे असेही ते म्हणाले.खा.पटोले यांनी संसारपयोगी साहीत्य व ग्रामगितेचे वाटप करून व सर्व वर-वधुंचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केले. प्रास्ताविक नाना पिलारे यांनी तर संचालन रामचंद्र राऊत व यशवंत नखाते यांनी केले. कार्यक्रमासाठी विलास पिलारे, मधुकर भोयर, मंगेश राऊत, श्रीधर राऊत, यांच्यासह मोहरणावासीयांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)साकोली : सामूहिक विवाह सोहळयाच्या माध्यमातून बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित होते, त्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत आम्ही हे कार्य प्रामाणिकपणे करीत आहोत. या सोहळयांच्या माध्यमातून ओबीसी बहुजन समाज विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे. ओबीसी समाजाचे स्वतंत्र मंत्रालय असावे अशी आमची लढाई होती. त्यात आम्हाला यश आले असून राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय तयार केले. बहुजनांना एकत्र आणण्याचे व्यासपीठ म्हणजे सामूहीक विवाह सोहळे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.पळसगाव (सोनका) येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळयात ते बोलत होते. यावेळी १३ जोडपी विवाहबध्द झाली. त्यांना खा.पटोले यांनी भेटवस्तू दिले. मंचावर आमदार परिणय फुके, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, श्रावण ब्राम्हणकर, उपसभापती लखन बर्वे, माजी जि.प. सदस्या सविता ब्राम्हणकर, भरत खंडाईत, नेपाल कापगते, घनशाम मेंढे, जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे, यादोराव कापगते, सरपंच कामिना भेंडारकर, सरपंच प्रेमराज गहाणे व राजू पालीवार उपस्थित होते. या विवाह सोहळयाला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)