शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३.३१ लाख रुपयांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: July 21, 2015 00:36 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध हातभट्टी मोहाफुलाची दारु गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्याविरुध्द १४ व १५ जुलै या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली

८४ जणांविरूद्ध गुन्हे दाखल : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई भंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध हातभट्टी मोहाफुलाची दारु गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्याविरुध्द १४ व १५ जुलै या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली. यात २१ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यामध्ये २०० लिटर हातभट्टीची गावठी दारु, मोहफुल रसायन, मोहफुलाचा सडवा, मोहफुले असे एकूण ३.३१ लाख ६५० रुपयांचा मुद्देमाल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. जिल्ह्यातील देशी, विदेशी दारु दुकानांची विक्री गैरव्यवहारामुळे कमी दाखविण्यात येत आहे. अशा अनुज्ञप्तींची सखोल तपासणी करण्यात येऊन विभागीय नियमभंग प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ८४ गुन्हे नोंदवून ४८ आरोपींना अटक केली. या कारवाईत १ हजार १४१ लिटर गावठी हातभट्टीची दारु, १७ लिटर देशी दारु तसेच २० हजार ५६५ लिटर मोहफुल रसायन (सडवा) जप्त केला असून त्याची एकूण किंमत ५ लाख १२ हजार ४९५ रुपये इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शासनाच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असून यापुढेही अशी विशेष मोहीम सुरु ठेवण्यात येणार आहे. ही मोहीम उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त पी.एच. पवार यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक एन.के. धार्मिक या नेतृत्वात करण्यात आली. या मोहीमेत निरिक्षक बी.डी. पटले, आर.व्ही. अंभोरे, आर.जी वानखेडे, दुय्यम निरीक्षक ए.आर. कैकाडे, एन.एस. धुरड, आर.आर. उरकुडे, एम.पी. चिटमलवार, आर.डी. बोलधने यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)