शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ३२ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 7, 2017 00:23 IST

साकोली तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे लाखनी व साकोली तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.

१५ संचालकांची निवड होणार : १,०४३ मतदार, प्रतिष्ठेची निवडणूकचंदन मोटघरे लाखनीसाकोली तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे लाखनी व साकोली तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे. लाखनी तालुक्यातील नावाजलेल्या सहकारी संस्थेची निवडणुक राजकीय दिग्गजासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. उमेदवार मतदारांच्या घरी मतांचा जोगावा मागण्यासाठी साकोली व लाखनी तालुका पिंजुन काढत आहेत.खविसची निवडणुक १२ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. लाखनी तालुक्यातील मतदार समर्थ विद्यालय व साकोली तालुक्यातील मतदार नंदलाल पाटील कापगते विद्यालयात मतदानाचा हक्क बजावणार आहे. वैयक्तिक गटाकरिता ९६२ सभासद मतदान करणार आहेत. तर संस्था प्रतिनिधी गटात ८१ मतदार मतदान करणार आहेत. निवडणुकीसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. १५ संचालक निवडुन दयावयाचे आहेत. काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनेल व भाजपा मित्र गट समर्थित शेतकरी विकास सहकारी पॅनलचे उमेदवार समोरासमोर असून दोन उमेदवार अपक्ष आहेत.वैयक्तिक सभासद प्रतिनिधी गटात शेतकरी परिवर्तन पॅनलचे गोपाल आगाशे, खिरोज गायधनी, ताराचंद जांगळे, झिबल बावनकुळे, माधवराव भोयर, सुरेश वाघाये, घनश्याम खेडीकर, लिलाधर गि-हेपुंजे, हरीदास पडोळे, भेनाथ मोहतुरे, मदन वाघाये, धोंडु वंजारी, नित्यानंद ठवकर, विनोद हनवतकर, १४ उमेदवार आहेत. महिला प्रवर्गातून देवका निर्वाण सिंधू बेलखाडे, यमुबाई गायधनी, सिरोजिनी वंजारी हे ४ उमेदवार संस्था प्रतिनिधी गटातून रामकृष्ण कापसे, शैलेश गजभिये, अशोक चेटुले, लिलाधर पटले, देवचंद करंजेकर, दिलीप राघोर्ते, संजय शिवनकर, केशव सेलोकर असे ८ उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय गटात मनिराम बोळणे, माधव वंजारी, अनुसूचित जाती जमाती गटात विशाल तिरपुडे, भजनदास बोरकर, विमुक्त भटक्या जाती/जमाती गटातून भागवत नान्हे, नामदेव राऊत निवडणूक मैदानात आहेत.उमेदवार प्रचारार्थ प्रत्येक गावातील मतदारांकडे फिरत आहेत. यापूर्वी खविसची निवडणुक अविरोध झाली होती. यावर्षी निवडणूक अविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण त्याला यश मिळाले नाही. संचालक पद प्राप्त करण्यासाठी उमेदवारांची चढाओढ आहे. तालुक्यातील जनतेचे लक्ष सदर निवडणुकीकडे लागले आहे. शेतक-यांच्या हितासाठी काम करणारी संस्था कर्चाच्या विळख्यात सापडलेली होती.