शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

२८ गावांना बसतो पुराचा तडाखा

By admin | Updated: August 9, 2014 00:48 IST

लाखांदूर तालुक्याला पावसाळ्यात चुलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते.

लाखांदूर : लाखांदूर तालुक्याला पावसाळ्यात चुलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. चुलबंद नदीकाठावरील १७ तर वैनगंगा नदीकाठावरील ११ गावांना पुराचा तडाखा बसतो. वाहतुकीच्या दृष्टीने साकोली पवनी, पवनी वडसा-अर्जुनी मोर. ही लाखांदुरला जोडणारी मार्ग बंद होतात. विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पूर्व तयारी करून अशी आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी जीवीत व वित्त हानी होईल या दृष्टीकोांतून महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असती तरी त्या २८ गावांना पुन्हा पुराचा तडाखा बसणार आहे.भंडारा शहराजवळील पाणी पातळीबाबत इशारा पातळी ९ मीटर आणि धोक्याची पातळी ०९.५० मिटर एवढी आहे. लाखांदूर तालुक्याचा दहा वर्षाचा पुराचा आलेख बघितला असता १९९४ मध्ये मोठा पूर आला होता. त्यावेळी पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर म्हणजेच १४.१० मिटरपर्यंत पोहचली होती. दि. १४ ते १७ सप्टेंबर २००५, १३ ते १७ आॅगस्ट २००६ या दरम्यान पूरसदृष्य परिस्थिती ओढावली होती. विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध निवारण पूर्वतयारी प्रतिसाद मदतचे पुनर्वसनाच्या बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अमलात आणलेला आहे. या कायद्यातील तरतुदीस अनुसरुन महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.तालुक्यातील नदीकाठावरील त्या २८ गावांना मदरवर्षी पुराचा तडाखा सहन करावा लागतो. यात जीवीतहानीपेक्षा शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वैनगंगा नदीमुळे ११ तर चुलबंद नदीमुळे १७ गावे बाधीत होतात. यामध्ये आवळी व खोलमारा बु. या दोन गावांचे पुरामुळे इतर गावांशी संपर्क तुडतो. ही दोन्ही गाव पुनर्वसीत आहेत. परंतु पुनर्वसन करताना शासनाने पूर्णपणे मदत कार्य पूर्ण न केल्याने आमचे पुनर्वसन झालेच नाही असे या गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय चुलबंद नदी नाले धरणामुळे नुकसान पोहचणाऱ्या आबादी गावांची संख्या ही ९ आहे. तर गोसे खुर्द धरणाच्या डाव्या कालव्यामुळे सुद्धा हजारो हेक्टर धानपिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना शासनाने ही बाब गंभीरतेने घेतली नसल्याने शेतकऱ्यांना आल्या दुष्काळाचा सामना मागील ४ वर्षापासून सहन करावा लागत आहे. तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्याकरिता लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तहसील कार्यालय लाखांदूर येथे बिनतारी संदेश यंत्रणा उपलब्ध असून शासनाकडून सदर यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित करण्यात आली आहे. वैनगंगा नदीमुळे प्रभावित गाव इटान, विरली बु. नांदेड, दोनाड, खैरना, मोहरना, गवराळा, टेंभरी, विहिरगाव, डांभेविरली, सावळी, सोनी, धर्मापुरी, पाऊलदवना, बोथली, परसोडी, मांढळ, किन्ही, आसोला, आथली, भागडी, खैरी पट, चप्राड, किनाळा, लाखांदूर, चिचोली, खोलमारा, बारव्हा यांचा समावेश आहे..आवळी गावाला पुराचा सर्वात जास्त तडाखा बसतो. आरोग्याचाही प्रश्न डोकेवर काढून साथीच्या रोगाचा सामना करावा लागतो. तालुक्याच्या ठिकाणी मदत शिबिरे घेण्यात येतात. यावर्षी पुरामुळे होणारी जिवीत व वित्तहानी रोखण्यासाठी ग्रामस्तरावर व तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याकरिता लाखांदूरचे तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार वंजारी, कांबळे यांनी सभा घेऊन त्या २६ गावांना सूचना दिल्या आहेत. पुरामुळे होणारे धोके टाळण्यापेक्षा शासनाने एकदा त्या गावाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी आहे. पुरपरिस्थिती उद्भल्यास जीवीत हानी होऊ नये तसेच वित्त हानीचे प्रमाण कमीत कमी असावे आणि पुरबाधीत नागरिकांना मदत व आधार देऊन त्यांचे जीवन पुर्ववत करण्यास मदत करणे यास दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार विजय पवार व पोलीस निरीक्षक प्रशांत कुळकर्णी यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)