शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

२८ लाखांचे चुकारे अडले

By admin | Updated: January 25, 2015 23:08 IST

पालोरा येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ३५३५.३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. जवळपास २० लाखांच्या चुकाऱ्यांचे वाटप झाले असले तरी २८ लक्ष रूपयांचे चुकारे थकीत आहेत.

पालोऱ्यातील प्रकार : शेतकरी मेटाकुटीलायुवराज गोमासे - करडी (पालोरा)पालोरा येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ३५३५.३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. जवळपास २० लाखांच्या चुकाऱ्यांचे वाटप झाले असले तरी २८ लक्ष रूपयांचे चुकारे थकीत आहेत. दुष्काळसदृश स्थिती असताना चुकारे अडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व मोहाडी तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वतीने पालोरा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मोठा गाजावाजा करून आ.चरण वाघमारे यांनी केंद्राचे उद्घाटन केले. त्यावेळी त्वरीत धानाच्या चुकाऱ्यांचे वाटप केले जाईल. अडचणी सोडविल्या जातील, असे जाहीर आश्वासन देण्यात आले होते. शेतकरीही आश्वस्त झाले होते. मात्र सद्य परिस्थिती वेगळीच आहे. चुकाऱ्यांच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. चुकाऱ्यांच्या हुंड्या न आल्याने धान्याची रक्कम देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.पालोरा येथील धान खरेदी केंद्रावर ‘ब’ ग्रेडच्या धानाची खरेदी करण्यात आली. दि.११ डिसेंबर २०१४ रोजी पालोरा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पटांगणावर खरेदी केंद्र उघडण्यात आले. परिसरातील ते एकमेव केंद्र असल्याने तसेच धान्य साठविण्याची, गोडावूनची कमतरता असल्याने चार ठिकाणी केंद्र हलवून हमी भावात धानाची खरेदी केली जाते. पालोरा, कोका, जांभोरा येथील केंद्रावर खरेदी झाल्यानंतर करडी येथील कृषी गोडावूनमध्ये खरेदी सुरु आहे. याठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाची साठवणूक केली आहे. डिसेंबर २०१४ ते २२ जानेवारी २०१५ पर्यंत एकूण ३५३.३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. एकूण ४८ लाख ८ हजार ८ रुपयांची खरेदी झाली. जवळपास २० लाखाच्या चुकाऱ्यांचे वाटप शेतकऱ्यांना आतापर्यंत करण्यात आले. मात्र हुंड्या न आल्याने शेतकऱ्यांचेन २८ लाख ८ हजार ८ रुपयांचे चुकारे अडले आहेत. रब्बी हंगामात करावयाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्याचप्रमाणे मुलामुलींच्या वैवाहिक कार्यक्रमासाठी गरज असताना चुकारे थकीत झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.