शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२७,६२९ पाठ्यपुस्तकांचा तुटवडा

By admin | Updated: June 13, 2017 00:17 IST

सर्व शिक्षा अभियानातंर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहू नये,...

देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्व शिक्षा अभियानातंर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहू नये, यासाठी यंदा एक लाख १५ हजार ७१ विद्यार्थ्यांसाठी एकूण सहा लाख ३८ हजार १०७ पुस्तकांची मागणी बालभारतीकडे नोंदविण्यात आली. यापैकी आतापर्यत सहा लाख १० हजार ४७८ पुस्तके प्राप्त झालेली आहेत. २०१७-१८ शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यत उर्वरीत २७ हजार ६२९ पुस्तक मिळतील, असा विश्वास जिल्हा परीषद शिक्षण विभागाने दिला.प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शैक्षणिक सत्र २७ जूनपासून सुरू होत आहे़ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे़ केंद्र शासनाच्या अभिनव योजनेपैकी ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे़ मराठी, हिंदी, उर्दू, सेमी इंग्रजी अशा माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पाठ्यपुस्तके मोफत वितरित करण्यात येतात. पुणे येथील पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारतीच्या माध्यमातून नागपूरच्या पाठ्यपुस्तक भंडार व वितरण केंद्र, बालभारतीला पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. जिल्हास्तरीय सर्व शिक्षा अभियानातंर्गत तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्याचे वितरण करण्यात येते. मात्र यावर्षी नागपूर येथून थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली. पाठ्यपुस्तके प्रत्येक शाळांना वितरण करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख १५ हजार ७१ विद्यार्थ्यांसाठी एकूण सहा लाख १० हजार ४७८ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी सहा लाख १० हजार ४७८ पुस्तके शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहेत. यामध्ये इयत्ता पहिलीच्या १३ हजार १५१ विद्यार्थ्यांना ३९ हजार ४५३ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी सर्वच पुस्तके प्राप्त झाली आहेत. इयत्ता दुसरीसाठी ३८,८७४ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी सर्व पुस्तकांची उचल करण्यात आली असून १२ हजार ९५८ विद्यार्थ्यांना त्याचे वाटप होणार आहे. इयत्ता तीसरीसाठी ५१ हजार ८२७ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी ४८ हजार ३५१ पुस्तकांची उचल करण्यात आली असून ३,४७६ पुस्तके अद्याप प्राप्त होऊ शकली नाही. इयत्ता चवथीकरिता ६९ हजार ८० पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी ६७,२८८ पुस्तका प्राप्त झालेल्या आहेत. इयत्ता चवथीचे लाभार्थी १३,७९४ एवढे आहेत. इयत्ता पाचवीच्या १४ हजार ७६३ विद्यार्थ्यांसाठी ८८ हजार ६२७ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी ८८ हजार ५१५ पुस्तके प्राप्त झाली आहेत. इयत्ता ६ वी च्या १५ हजार ४२६ विद्यार्थ्यांसाठी एक लक्ष ३९ हजार १४६ पाठ्यपुस्तकांची उचल करण्यात आली असून एक लाख ८ हजार १२ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी सर्व पुस्तके प्राप्त झालेली आहेत. इयत्ता सातवीकरिता १४ हजार ४६२ पाठ्यपुस्तके अद्यापही प्राप्त होऊ शकली नाही. एक लाख ९ हजार ८४२ पाठ्यपुस्तकांच्या मागणीपैकी ९५ हजार ३८० पाठ्यपुस्तकांची उचल केली आहे. एकूण लाभार्थी १५ हजार ६८६ एवढी आहे. इयत्ता आठवीचे लाभार्थी संख्या १६ हजार ३६३ असून बालभारतीकडे एक लाख ३२ हजार ३९२ पाठ्यपुस्तकांची मागणी केली.जिल्ह्यातील १,१६९ शाळांना मिळणार पुस्तकेजिल्ह्यातील १,१६९ शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यात ७९९ जिल्हा परीषद शाळा, २४ नगरपालिका शाळा, ३४३ खासगी अनुदानित शाळा व शासकीय, समाजकल्याण व आदीवासी विभागातंर्गत असलेल्या प्रत्येकी एक शाळेचा समावेश आहे.इयत्ता ७ व ९ वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशितमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे यांच्या परिपत्रकान्वये शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून इयत्ता ७ व ९ वी ची सर्व पाठ्यपुस्के नव्याने प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच "प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२" सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इय्यता ३ री परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) व इयत्ता ४ थी व ५ वी परिसर अभ्यास भाग-१ व भाग-२ ही पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०१८- १९ मध्ये बदलणे अपेक्षित आहे. त्यामुळे २०१७- १८ मध्ये जुन्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहणार आहे.