बायोमेट्रिक प्रणालीने होणार धान्यवाटपप्रशांत देसाई भंडारासार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी रेशन कार्ड स्मार्ट केले जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील २.७५ लाख शिधापत्रिका संगणकीकृत केले जात आहे. त्याला आधार क्रमांकाची जोड देऊन यापूढे बायोमेट्रिक प्रणालीने धान्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत प्रत्येक लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे.भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ७५,४१४ आहे. त्यापैकी दोन लाख ७५,६१५ शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिका बारकोड प्रणालीने जोडण्यात येणार आहे. यात प्राधान्य गट, अंत्योदय, अन्नपूर्णा, केसरी, शुभ्र शिधापत्रिकाधारकांचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यात बारकोड प्रणालीने शिधापत्रिका जोडण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अडीच लाख शिधापत्रिका या प्रणालीशी जोडण्यात आलेल्या आहेत. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेले वितरण व्यवस्थेतील धान्य खासगी बाजारात विकले जात असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. धान्याच्या काळा बाजाराला आळा बसावा यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले जात आहेत. संगणकीकरणाचा वापर केल्याने एका नागरिकाला एकच शिधापत्रिका मिळणे शक्य होईल. या संगणकीकृत यादीत मयत व्यक्तींच्या नावांची दुरूस्ती करता यावी, यासाठी राशन दुकानदारांमार्फत नव्याने अर्ज भरून घेतले जात आहेत. मुळ गावापासून दूर राहत असलेल्या व्यक्तीचे दोन ठिकाणी शिधापत्रिका असल्याचे अनेक प्रकरण आहेत. परंतु ‘डी डुप्लिकेशन’मुळे याची माहिती त्वरीत उपलब्ध होणार असून, असे दुहेरी कार्ड रद्द केले जाणार आहेत. राशन दुकानातील व्यवहाराने संगणकीकरण करण्यात येणार असून बारकोड असलेल्या शिधापत्रिका दिले जाणार आहे. बारकोडेड शिधापत्रिका तयार करण्यासाठी लाभार्थ्यांकडून एक अर्ज भरून घेतला जात आहे. या अर्जात आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक मागवले जाणार आहेत. हे अर्ज प्रत्येक राशन दुकानदार आणि ग्रामीण भागात तहसीलदारांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.दुहेरी शिधापत्रिकेला आळाआधार क्रमांकामुळे या प्रणालीत दुहेरी राशन कार्ड लगेच ओळखता येणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक प्रत्येक राशन कार्डधारकांना द्यावाच लागणार आहे. राशन दुकानांमध्ये आता बायोमेट्रिक पद्धतीने धान्य दिले, याची माहिती त्वरित उपलब्ध होईल. त्यामुळे धान्याची काळाबाजारी थांबेल. यामुळे धान्याची बचत होणार आहे.अर्जाची नि:शुल्क विक्रीरेशन कार्डधारकांना आधार कार्ड, बँक खात्याविषयी माहिती सादर करता यावी म्हणून शासनाकडून नि:शुल्क अर्ज स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जासाठी प्रत्येकी पाच रूपये दुकानदाराला शासनाकडून दिले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, असे असताना काही दुकानदारंकडून दोन रूपयांमध्ये अर्जाची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.बायोमेट्रिक प्रणालीने गैरप्रकाराला आळाधान्याची बचतसार्वजनिक राशन व्यवस्थेत बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात आल्यानंतर ३० टक्के धान्याची बचत होणार आहे. संगणकीकरणामुळे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका असलेले बोगस शोधण्यास मदत मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार आहे.- अनिल बनसोड, जिल्हा पुरवठा अधिकारी
२.७५ लाख रेशन कार्ड होणार ‘स्मार्ट’
By admin | Updated: May 12, 2015 00:33 IST