शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शिक्षणावर २५ टक्के निधीचा वापर

By admin | Updated: April 3, 2017 00:31 IST

आजची शिक्षण प्रणाली भविष्यातील भक्कम पाया उभारु शकत नाही. आजचे विद्यार्थी उद्याची गुंतवणूक आहे.

पत्रपरिषद : नाना पटोले यांची माहिती, भंडारा शहरातून होणार उड्डाणपूलभंडारा : आजची शिक्षण प्रणाली भविष्यातील भक्कम पाया उभारु शकत नाही. आजचे विद्यार्थी उद्याची गुंतवणूक आहे. त्यामुळे डिजिटल शिक्षण प्रणालीचा योग्य उपयोग करुन सशक्त तंत्रज्ञानयुक्त तरुण पिढी निर्माण करण्यावर भर देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीचा २५ टक्के वापर शिक्षणावर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली. रविवारी दुपारी ३ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. खा. पटोले म्हणाले भंडारा जिल्ह्यात गुणवंतांची खाण आहे.मात्र शैक्षणिक पिढी घडवित असताना आधुनिक क्षेत्रात स्वत:च्या पायावर उभे होवून स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे आहे. बेरोजगारीवर हाच खरा उपाय आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांमधूनही उत्कृष्ट शिक्षण देत असताना डिजीटल क्रांतीचा सगळ्यात खालच्या स्तरातील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होतो आहे का? हे चाचपडून पाहणे ही अत्यंत गरजेचे आहे. सिंचन सुविधांबाबत बोलताना खा. पटोले म्हणाले, येत्या काही महिन्यात भंडारा जिल्ह्यात ६० टक्के सिंचन व्यवस्था निर्माण होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रस्तावित बांधकाम करण्याची टेंडर प्रक्रिया येत्या सहा महिन्यात पूण करण्यात येईल. यात भंडारा शहरा बाहेरून बायपास मार्ग न काढता शहरातूनच उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत पुर्नवसनाची कामे धडाक्यात सुरु करण्यात आली आहे. कार्य पुर्ण करण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार की नाही? हे तुर्तास सांगणे कठीण असले तरी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कर्जमाफी करण्याची विनंती करण्यात आली आहे. पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना खा. पटोले म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात बातम्यांच्या माध्यमातून कलंक लावण्यावर अंकूश लावणे अत्यंत गरजेचे आहे. वेळप्रसंगी अशांवर मानहानीचा दावाही करावा लागेल, तर मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला नगरसेवक नितीन धकाते, विकास मदनकर, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)विशी येथे विद्यार्थी-पालक संमेलनडिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तर ते शहरी भागापर्यंत लोकसहभागातून शाळांचा दर्जा शिक्षण, गुणवत्ता व शैक्षणिक संपूर्णत: बाबत कसा श्रेष्ठ करता येईल यावरही भर देण्यात येणार आहे. यासाठी साकोली तालुक्यातील विर्शी येथे १८ एप्रिलला डिजिटल शिक्षण प्रणालीवर शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.