शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनाचे २३ लाख थकीत

By admin | Updated: August 9, 2014 23:32 IST

जिल्ह्यातील १२ मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन थकीत आहे. फेब्रुवारी २०१२ व आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या महिन्यांचे सुमारे २२ लाख ९२ हजार ६१ रुपये थकीत

भंडारा : जिल्ह्यातील १२ मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन थकीत आहे. फेब्रुवारी २०१२ व आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या महिन्यांचे सुमारे २२ लाख ९२ हजार ६१ रुपये थकीत असून ते महिनाभरात न मिळाल्यास विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.फेब्रुवारी २०१२ या महिन्याचे वेतन न मिळालेल्या एकूण १२ महाविद्यालय आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यु.कॉलेज, लाखांदुर, शारदा ज्यु.कॉलेज, तुमसर, सुदामा ज्यु.कॉलेज, मोहाडी, ग्रामविकास ज्यु.कॉलेज, हरदोली, सर्वांगीण शिक्षण ज्यु.कॉलेज, पिंडकेपार, नवनीत ज्यु.कॉलेज, खमारी, मार्तंडराव पाटील कापगते ज्यु.कॉलेज, जांभळी/सडक, मॉडर्न ज्यु.कॉलेज, सातोना, महात्मा गांधी ज्यु.कॉलेज, पहेला, महाराष्ट्र ज्यु.कॉलेज, सिहोरा, शशीकांत दैठणकर ज्यु.कॉलेज, बारव्हा, गंगाराम ज्यु.कॉलेज, मासळ या बारा ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांचे एकूण ४ लाख ३८ हजार १९६ रुपयाचे वेतन शासनाने अडवून ठेवलेले आहे.आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंतचे वेतन खालील सात ज्यु.कॉलेज,च्या शिक्षकांचे थांबलेले आहेत. त्यामध्ये सुदामा ज्यु.कॉलेज, मोहाडी, आरएसजीके ज्यु.कॉलेज, तुमसर, ग्रामविकास ज्यु.कॉलेज, हरदोली, मार्तंडराव पाटील कापगते ज्यु. कॉलेज, जांभळी/सडक, सर्वांगीण शिक्षण ज्यु.कॉलेज, पिंडकेपार, दैठणकर ज्यु.कॉलेज, बारव्हा, चैतन्य ज्यु.कॉलेज, बाम्पेवाडा /एकोडी, या सात ज्यु.कॉलेज शिक्षकांचे एकूण १८ ५३ हजार ८६५ रुपयाचे वेतन शासनाकडे थकीत आहेत. एक महिना वेतन मिळाले नाही तर मुलांचे शिक्षण, घरखर्च कसा करावा असा प्रश्न पडतो. संबंधित रकमेची मागणी शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक, भंडारा यांनी शासनाकडे केली आहे. थकित वेतन न मिळाल्यास विज्युक्टातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मार्तंड गायधने व राजेंद्र दोनाडकर यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)