शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२३ हेक्टरचा तलाव उरला ७.३१ हेक्टरचा

By admin | Updated: May 29, 2015 00:58 IST

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात नोंद असली तरी काही तलाव बुजले तर बहुतांश तलाव अतिक्रमणधारकांनी बळकावले आहेत.

मोहन भोयर तुमसरतलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात नोंद असली तरी काही तलाव बुजले तर बहुतांश तलाव अतिक्रमणधारकांनी बळकावले आहेत. तुमसर तालुक्यातील आष्टी येथे सर्वाधिक ५८ तलाव होते. आता केवळ १४ तलाव शिल्लक राहिले असून २३ हेक्टरचे तलाव ७.३१ हेक्टरचे उरले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, तलावाच्या मालकीवरुन जिल्हा परिषद व लघुपाटबंधारे विभागाची एकमेकावर कुरघोडी सुरू आहे.भंडारा जिल्ह्यात शासनदप्तरी १,१५९ तलावांची नोंद आहे. तुमसर तालुक्यातील आष्टी गावात ५८ माजी मालगुजारी तलावांची नोंद आहे. प्रत्यक्षात या गावात केवळ १४ तलाव शिल्लक आहेत. आष्टी येथील मामा तलावाचे खोलीकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु आहे. जिल्हा परिषदेने हा तलाव मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था, आष्टी या संस्थेला पाच वर्षाकरिता मासेमारीकरीता कंत्राटासाठी दिला आहे. तलावाचे क्षेत्रफळ ७.३१ हेक्टर आहे. येथे केवळ एक हेक्टरमध्ये पाणी असतो. सन १९८० च्या रेकॉर्डनुसार हा तलाव २३ हेक्टरमध्ये असल्याची नोंद आहे. जिल्हा परिषदेने आतापर्यंत तलावाचे खोलीकरण करण्याची तसदी घेतली नव्हती. तलावाचे खोलीकरण न झाल्याने तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीचा विस्तार करून तलावात अतिक्रमण केले. त्या खोलीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध केला. तलावाचे खोलीकरण झाले असते तर पाण्याची पातळी वाढून त्याचा सिंचनाकरिता लाभ झाला असता. या तलावाची लीज (भाडेतत्व) जिल्हा परिषदेमार्फत नियमित घेतली जात असल्यामुळे हा प्रकार मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तलाव खोलीकरणाची मागणी केली असता हा विषय ग्रामपंचायतीचा असून स्थानिक स्तरावर प्रश्न निकाली काढण्यासाठी सांगितले. उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवरतलावाच्या शेजारी शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी वापर सहकारी संस्था सुरु केल्या आहेत. याच संस्थेचे पदाधिकारी तलावावर अतिक्रमण करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात मासेमारी उद्योग नावापुरतेच शिल्लक आहे. दीड लक्ष मासेमार बांधवांची लोकसंख्या असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.चौकशी करण्याची मागणीयासंदर्भात मच्छिंद्र मत्स्यपालन संस्थेने तुमसर येथील भूमापन कार्यालयाकडे ७,५०० रुपये भरुन तलावाची मोजणी करण्यासाठी अर्ज केला. अधिकाऱ्यांनी तलावस्थळी येऊन तलावाचे मोजमाप न करता शेजारील शेतीचे मोजमाप करून तलावाची सीमा आखून दिली. तीन बाजूंनी तलावाची नवीन पाळ अस्तित्वात येत असून तलावालगतच्या शेतकऱ्यांना १० एकरावर जागा मिळाली आहे. यात भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे मोजमाप केले असून याप्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार केवट, आनंद भुरे, संजय मोहनकर आणि संजय केवट यांनी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मत्स्यपालन सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.