शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांत २२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:03 IST

अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यासाठी धोक्याची घंटा : जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात आठ दलघमी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण ६३ प्रकल्प आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बपेरा, मोहाडी तालुक्यातील टेकेपार बोथली आणि सोरणा हे चार मध्यम प्रकल्प आहे तर ३१ लघु प्रकल्प असून २८ माजी मालगुजारी तलाव आहे. चांदपूर प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पीत जलसाठा २८.८७ दलघमी असून सध्या याप्रकल्पात ७.४० दलघमी साठा आहे. तर बपेरा, टेकेपार बोथली आणि सोरर्णा या प्रकल्पात केवळ मृत जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पात दुप्पट म्हणजे १५.८३ टक्के जलसाठा होता. यावर्षी पडलेल्या अपुºया पावसाने पुर्णक्षमतेने प्रकल्प भरले नाहीत.जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्प क्षमता ५३.५४ दशलक्ष दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात १२.९८ दलघमी उपयुक्त जलसाठा असून २४.२५ दलघमी मृतसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठ्याचे टक्केवारी १२.९८ आहे. २८ माजी मालगुजारी तलावांची प्रकल्पीय संकल्पीत क्षमता २५.३८ दलघमी असून सध्या या प्रकल्पात ५.९१ दलघमी म्हणजे २३.२९ टक्के जलसाठा आहे.या प्रकल्पातील अपुºया जलसाठ्याचा परिणामी उन्हाळी पिकांवर होणार आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडले जाणार नाही. सर्व पाणी पिण्यासाठी आणि चारापिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासून पाण्याचा वापर जपून करण्याची गरज आहे.पाच वर्षांपासून घटतोय जलसाठाधान उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या भरोशावर अवलंबून आहे. मात्र गत पाच वर्षाचा तुलनात्मक अभ्यास केला असता दरवर्षी पावसाचे आणि परिणामी जलसाठ्याचे प्रमाण कमी होत आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ८१.६५ टक्के जलसाठा होता. २०१५ मध्ये निचांकी पातळीला जावून १८.५५ टक्के, २०१६ मध्ये २३.२६ टक्के आणि २०१७ मध्ये ४३.७५ टक्के जलसाठा होता. मात्र गत पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने सध्या प्रकल्पात २२.१८ टक्के जलसाठा आहे.