शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजातून २२ कोटींचा महसूल

By admin | Updated: February 13, 2017 00:17 IST

बांधकामासाठी उपयुक्त असलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंत या दहा महिन्यात जिल्ह्यातील ५३ वाळूघाटांपैकी २१ वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला.

दंडापोटी २.७५ लाखांची वसुली : ५३ पैकी २१ रेतीघाटांचा लिलावइंद्रपाल कटकवार भंडाराबांधकामासाठी उपयुक्त असलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंत या दहा महिन्यात जिल्ह्यातील ५३ वाळूघाटांपैकी २१ वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला. त्यातून शासनाला २२ कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. याशिवाय जानेवारी अखेरपर्यंत महसूल व खनिकर्म विभागाने १०७९ अनिधकृत रेती व इतर गौण खनिज चोरी प्रकरणात कारवाई करून २ कोटी ७५ लक्ष ५३ हजार ४२३ रुपये महसूल शासनाला मिळवून दिला आहे. ९७ अनिधकृत रेती व इतर गौण खनिज प्रकरणात कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत काहीवाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. वाळूप्रकरणी ठेकेदार, लिलावधारक, वाहन मालक-वाहनचालक दोषी आढळल्यास त्यांचेविरूध्द प्रचलित नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहे. परिणामी वाळूचा व इतर गौण खनिजांचा नियमबाह्य उपसा तसेच चोरटी वाहतूक करणाऱ्यावर आळा घालणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जिल्ह्याला गौण खनिजांचे वरदान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रेतीचे अनधिकृत उत्खनन व वाहतूक होवू नये यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर भरारी पथके गठीत करण्यात आली असून ही पथके प्रभावीपणे काम करीत आहेत.- सुरेश नैताम,जिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा.